गायक मिका सिंगला भारतीय सिने असोसिएशनने केले बॅन

भारतीय गायक मिका सिंग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नुकतेच त्याने पाकिस्तानमधील कराचीमध्ये परफॉर्मन्स सादर केला होता. यासाठी ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने मिका सिंगवर बंदी आणली आहे. 

New Delhi
singer mika singh
मिका सिंगला अटक

भारतीय गायक मिका सिंग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नुकतेच त्याने पाकिस्तानमधील कराचीमध्ये परफॉर्मन्स सादर केला होता. ज्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये मिकाने ‘जुम्मे की रात है…’, हे गाण गायल होतं. या घटनेमुळे मिका सिंगला भारतीयांच्या नाराजीचा सामना करावा लागला होता. जम्मू-काश्मीर प्रकरणी केंद्र सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर भारत-पाकिस्तानमधील ताण-तणाव वाढले होते. या पार्श्वभूमीवर मिका सिंगचे कराचीत जाऊन परफॉर्मन्स सादर करणे त्याला चांगलेच महागात पडले आहे. यासाठी ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने मिका सिंगवर बंदी आणली आहे. तसेच सर्व म्युजिक कंपनी, मुव्हीज प्रोडक्शन हाऊस आणि ऑनलाइन म्युजिक कंटेंट प्रोव्हायडरमधून त्याला बॉयकॉट करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला हजेरी

जनरल परवेज मुशर्रफचे नातलग असद यांची मुलगी सेलिनाच्या हिच्या मेहंदीकरता मिका सिंग नाइट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम डिफेंस हाऊस अथॉरिटी (डीएचए), फेज-८ मधील २३, बीच एव्हेन्यूमध्ये ठेवण्यात आला होता. सांगितले जाते की, ही जागा डी कंपनीचे सदस्य अनीस इब्राहीम आणि छोटा शकील यांच्या कराचीमधील घरापासून नजीक आहे.

हेही वाचा –

Video: गाजर ज्यूस पित असाल तर सावधान!

‘अभिनंदन’ वर्धमान, स्वातंत्र्य दिनी शौर्याला सलाम