घरदेश-विदेशकुलभूषण जाधवसाठी भारताच्या दबावाखाली येऊन कायदा बदलणार नाही; पाक बरळला

कुलभूषण जाधवसाठी भारताच्या दबावाखाली येऊन कायदा बदलणार नाही; पाक बरळला

Subscribe

पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद असलेल्या भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी त्यांच्या साप्ताहिक निवेदनात म्हटले आहे की, भारताने काऊन्सिलर अॅक्सेस स्टँड मांडले आहे. आम्ही त्यावर काम करत आहोत. यापूर्वीही आम्ही भारताला विना अडचण काऊन्सिलर अॅक्सेस दिला होता. तसेच पाकिस्तार भारताच्या दबावाखाली येऊन कुलभूषण जाधवसाठी देशाचा कायदा बदलू शकत नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

भारताला पाकिस्ताच्या कोर्टाला सहकार्य करायला हवे, असेही त्यांच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्या पाकिस्तान विरोधातील वक्तव्यावर भाष्य केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जाहिद हफीज चौधरी यांनी दिलेल्या निवेदनात, भारताच्या सैन्य प्रमुखाच्या वक्तव्यातून भाजप आणि आरएसएसची विचारधारा असणारी मानसिकता साफ दिसून येत आहे.

- Advertisement -

पाकिस्तानमधील लष्कर कोर्टाने एप्रिल २०१७ ला कुलभूषण जाधव यांना गुप्तहेर आणि दहशतवादी असल्याचा आरोप करत मृत्यूची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर काही आठवड्यांनी भारताने जाधव यांच्यापर्यंत दुतावास पोहोचू न दिल्याने तसेच त्यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेवरून पाकिस्तानविरोधात आंतरराष्ट्रीय कोर्टात (आयसीजे) मध्ये याचिका दाखल केली. आयसीजेने तेव्हा पाकिस्तान कोर्टाने दिलेल्या निर्णयावर स्थगिती आणली.

हेही वाचा –

कंगनाला भेटल्यानंतर तिच्या राजकीय वाटचालीबाबत रामदास आठवलेंचे संकेत!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -