घरCORONA UPDATEकोरोनाचा धोका वाढला, परदेशातून आलेले अनेक प्रवासी बेपत्ता

कोरोनाचा धोका वाढला, परदेशातून आलेले अनेक प्रवासी बेपत्ता

Subscribe

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी सरकारला एक पत्र पाठवले आहे. या पत्रातील माहितीने सरकारचीच नाही तर प्रत्येक देशवासियाची झोप उडवली आहे. या पत्रात गौबा यांनी १८ जानेवारीपासून २३ मार्चदरम्यान परदेशातून तब्बल १५ लाख नागरिक भारतात आले आहेत. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व राज्य सरकार ज्यांच्यावर लक्ष ठेऊन आहे ती संख्या अगदीच नगण्य असून इतर जणांचा ठावठिकाणाच नाहीये. यामुळे या लोकांमुळे देशात कोरोनाचा धोका वाढू शकतो असे सांगून चिंता व्यक्त केली आहे.

आज शुक्रवारी गौबा यांनी सरकारला सांगितले की गेल्या दोन महिन्यांपासून १५ लाखांहून अधिक नागरिक परदेश यात्रेवरून भारतात आले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या या नागरिकांवर लक्ष ठेवण्याचे काम सरकारने काही संस्थांना दिले आहे. पण उर्वरित नागरिक कुठे आहेत याची काहीच माहिती उपलब्ध नाहीये. यात जर काहीजण कोरोनाग्रस्त असतील तर याचे भयंकर परिणाम होऊ शकतात. अशी शंकाही या गौबा यांनी व्यक्त केली आहे. तसेच परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारने अशा लोकांना शोधून काढणे गरजेचे असून आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनूसार त्यांना क्वारनटाईन करणे गरजेचे आहे. असेही गौबा यांनी पत्रात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -