घरदेश-विदेशआलोक वर्मा यांचा अखेर राजीनामा

आलोक वर्मा यांचा अखेर राजीनामा

Subscribe

आलोक वर्मा यांची नियुक्ती सर्व्हिस अॅण्ड होम गार्डच्या महासंचालकपदी करण्यात आली होती. मात्र आलोक वर्मा यांनी आज या पदाची जबाबदारी स्विकारली नाही. त्यानंतर त्यांनी काही तासातचं पदाचा राजीनामा दिला आहे.

सीबीआयच्या संचालक पदावरुन हकालपट्टी केल्यानंतर आलोक वर्मा यांनी आज राजीनामा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियुक्ती समितीच्या बैठकीत आलोक वर्मा यांना पदावरुन हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान त्यांची नियुक्ती सर्व्हिस अॅण्ड होम गार्डच्या महासंचालकपदी करण्यात आली होती. मात्र आलोक वर्मा यांनी आज या पदाची जबाबदारी स्विकारली नाही. त्यानंतर त्यांनी काही तासातचं पदाचा राजीनामा दिला आहे. ‘मला अंतर्मुख होण्याची वेळ आली’ असल्याचे त्यांनी राजीनाम्याच्या अर्जामध्ये म्हटले आहे.

पंतप्रधानांच्या बैठकीनंतर निर्णय

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांची काल सीबीआयच्या संचालक पदावरुन उचलबांगडी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी काल नियुक्ती समितीची बैठक बोलावली होती. दोन तास चाललेल्या या बैठकीनंतर त्यांना पदावरुन हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना प्रमुख पदावरुन हटवण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली होती. त्यानंतर आलोक वर्मा यांना सीबीआयच्या प्रमुख पदावर पुन्हा रुजू होण्यास सांगितले होते. बुधवारी त्यांनी पदभारही स्विकारला होता. मात्र त्यानंतर त्यांची पदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती. दरम्यान विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आलोक वर्मा यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता.

- Advertisement -

सीव्हीसीमधील वाद समोर

आलोक वर्मा यांच्याबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा केंद्र सरकारला मोठी चपराक होती. दरम्यान पुन्हा पदभार स्वीकारल्यानंतर आलोक वर्मा यांची बदली करण्यात आली. यावेळी सीव्हीसीमधील वाद देखील समोर आला. सीव्हीसीमध्ये मुख्य न्यायधीशांच्या वतीनं बाजू मांडणारे न्यायमूर्ती सिक्री यांनी आलोक वर्मा यांच्यावर आरोप असल्याचा उल्लेख केला. त्याला आक्षेप घेत लोकसभेतील काँग्रसचे गटनेते मल्लिकार्जून खरगे यांनी कोणते आरोप? असा सवाल केला. त्यानंतर मात्र सीव्हीसीमधील मतभेद समोर आले. मात्र, सीव्हीसीच्या बैठकीनंतर देखील आलोक वर्मा यांची बदली रोखता आली नाही. सीव्हीसीच्या बैठकीमध्ये मात्र कोणताही तोडगा निघू शकला नाही. ‘आलोक वर्मा यांची बदली करण्यासाठी समितीकडे कोणतेही ठोस आरोप नाहीत’, असा युक्तिवाद मल्लिकार्जून खरगे यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -