CBI चे माजी संचालक अश्वनी कुमार यांची आत्महत्या

गेल्या काही दिवसांपासून अश्वनी कुमार हे नैराश्याच्या गर्तेत असल्याचे सांगितले जात आहे.

अश्वनी कुमार

सीबीआयचे माजी संचालक मणिपूर नागालँडचे माजी गव्हर्नर अश्वनी कुमार यांनी आत्महत्या केली आहे. त्यांचा मृतदेह शिमला येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे. कुमार हे डीजीपी आणि सीबीआयचे प्रमुखही राहिले आहेत. शिमल्याचे पोलीस अधीक्षक मोहित चावला यांनी ANI ला ही माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अश्वनी कुमार हे नैराश्याच्या गर्तेत होते. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि डॉक्टरांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलीस अधिकाऱ्यांसाठी ते एक आदर्श होते त्यांचा मृत्यू अशाप्रकारे होणं ही अत्यंत दुःखद घटना आहे अशी प्रतिक्रिया मोहित चावला यांनी दिली आहे.

अश्विनी कुमार हिमाचल प्रदेशचे डीजीपी म्हणून ऑगस्ट २००६ ते जुलै २००८ पर्यंत काम करत होते. यानंतर त्यांची सीबीआय चीफ म्हणून नेमणूक झाली. अश्विनी कुमार या पदावर २ ऑगस्ट २००८ ते ३० नोव्हेंबर २०१० या काळापर्यंत होते. यानंतर त्यांची मणिपूरचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. अश्विनी कुमार यांनी जुलै २०१३ ते डिसेंबर २०१३ या काळात हे पद सांभाळले होते.


Drugs Case : महिन्याभराने रिया घरी परतली; भायखळा कारागृहातून जामीनावर सुटका