घरदेश-विदेशदेशाचे माजी दक्षता आयुक्त के. व्ही. चौधरी आता रिलायन्सचे संचालक!

देशाचे माजी दक्षता आयुक्त के. व्ही. चौधरी आता रिलायन्सचे संचालक!

Subscribe

माजी केंद्रीय दक्षता आयुक्त के. व्ही. चौधरी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये स्वतंत्र संचालक म्हणून वर्णी लागली आहे.

देशाचं केंद्रीय दक्षता आयुक्तपद अर्थात सीव्हीसी पद भूषवलेले के. व्ही. चौधरी हे आता रिलायन्समध्ये दाखल झाले आहेत. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या स्वतंत्र संचालक पदावर त्यांची वर्णी लागली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपचं सरकार आलं, त्यानंतर त्यांची जून २०१५मध्ये केंद्रीय दक्षता आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. यासंदर्भातला निर्णय जून २०१८मध्ये झालेल्या रिलायन्सच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीमध्येच घेण्यात आला होता. त्यासंदर्भातलं परिपत्रक देखील कंपनीकडून जारी करण्यात आलं होतं.

कोण आहेत के. व्ही. चौधरी?

  • १९७८ च्या भारतीय महसूल सेवा बॅचचे अधिकारी
  • ऑगस्ट २०१४मध्ये केंद्रीय कर महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती
  • काळ्या पैशासंदर्भात महसूल विभागाचे सल्लागार म्हणून देखील जबाबदारी
  • जून २०१५मध्ये सीव्हीसीपदी लागली वर्णी
  • भारताच्या महालेखापरिक्षकांच्या (कॅग) सल्लागार मंडळात देखील समावेश
  • नुकतेच रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती
  • सीसीएल प्रॉडक्ट्स कंपनीतही संचालक मंडळात सदस्यपदी

दरम्यान, इतक्या महत्त्वाच्या पदावर भारतीय सेवेत काम केलेली व्यक्ती रिलायन्स सारख्या उद्योगसमूहामध्ये रुजू झाल्यामुळे त्यावर चर्चा होऊ लागली आहे. दरम्यान, हा निर्णय कार्यकारी मंडळाच्या मंजुरीनंतरच घेण्यात आल्याचं रिलायन्सकडून सांगण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -