घरदेश-विदेशगुजरातचे माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्टला जन्मठेपेची शिक्षा

गुजरातचे माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्टला जन्मठेपेची शिक्षा

Subscribe

गुजरातमधील जामनेर हिंसाचार प्रकरणी माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कोर्टाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

गुजरातमधील जामनेर हिंसाचार प्रकरणी माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कोर्टाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. १९९० मध्ये पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी आयपीसीच्या कलम ३०२ अन्वये गुजरातमधील जामनेर कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. संजीव भट्ट हे १९९० मध्ये जामनेर येथे पोलीस अधीक्षक या पदावर कार्यरत होते. पोलीस अधिकारी प्रवीण सिंह यालाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण

१९९० मध्ये जामनगरमध्ये भारत बंददरम्यान हिंसाचार झाला होता. यावेळी संजीव भट्ट जामनगर येथे एएसपी म्हणून कार्यरत होते. यावेळी ११३ लोकांना पोलिसांनी अटक केली होती. यामधील २५ जण जखमी झाले होते, तर आठ जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. न्यायालयीन कोठडीत राहिल्यानंतर एक आरोपी प्रभुदास माधवजी वैश्नानी यांचा मृत्यू झाला होता. संजीव भट्ट आणि त्याच्या सहाकाऱ्यांवर आरोपीला कोठडीत मारहाण करण्याचा आरोप करण्यात आला होता. संजीव भट्ट आणि इतरांविरोधात याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. पण गुजरात सरकारने खटला चालवण्याची परवानही दिली नव्हती. अखेर २०११ मध्ये राज्य सरकारने संजीव भट्ट याच्याविरोधात खटला चालवण्याची परवानगी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -