घरदेश-विदेश'शिवसेनेसोबत जाण्यापेक्षा काँग्रेसने भाजपला पाठिंबा द्यावा'

‘शिवसेनेसोबत जाण्यापेक्षा काँग्रेसने भाजपला पाठिंबा द्यावा’

Subscribe

'त्यापेक्षा काँग्रेसनं मवाळ हिंदुत्ववादाचा स्वीकार करणाऱ्या भाजपासोबत जाणं कधीही सोयीचे आहे'

राज्यात सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नसून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे राजकीय पक्ष सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल करताना दिसताय. यादरम्यान कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी काँग्रेसला सल्ला दिला आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेना आग्रमक असून, त्या तुलनेत भाजपाचे हिंदुत्व सॉफ्ट आहे. त्यामुळे काँग्रेसने विचार करावा, असे मत कुमारस्वामींनी व्यक्त करत असताना शिवसेनेसोबत जाण्यापेक्षा काँग्रेसने भाजपला पाठिंबा द्यावा, असा मोलाचा सल्ला काँग्रेसला दिला आहे.

- Advertisement -

तसेच, “जहाल हिंदुत्वादी विचारांच्या पक्षाशी जुळवून घेताना काँग्रेस अस्थिर होते. त्यापेक्षा काँग्रेसनं मवाळ हिंदुत्ववादाचा स्वीकार करणाऱ्या भाजपासोबत जाणं कधीही सोयीचे आहे. तीन पक्षांसोबत सरकार स्थापन करण्यापेक्षा काँग्रेस भाजपासोबत जाण्याचा पुनर्विचार करेल की नाही, मला माहिती नाही,”, असे देखील त्यांनी कर्नाटकात होत असलेल्या पोटनिवडणुक दरम्यान घेण्यात आलेल्या प्रचार सभेत म्हटले. मात्र कुमारस्वामींनी सेनेसोबत जाण्यापेक्षा भाजपाला पांठिबा देत त्याच्यासह जावे, असा काँग्रेसला दिलेल्या सल्ल्याचा कितपत विचार करतात… हा प्रश्नच आहे.


आज शरद पवार-सोनिया गांधी भेट; पाठिंब्यावर दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -