घरदेश-विदेशभारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोमात; आर्मी रुग्णालयाची माहिती

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोमात; आर्मी रुग्णालयाची माहिती

Subscribe

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृतीत अद्याप काहीही सुधारणा झालेली नाही. प्रणव मुखर्जी सध्या कोमात गेल्याची माहिती आर्मी रुग्णालयाने दिली आहे. शिवाय, त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा नसल्याने प्रणव मुखर्जींना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. एएनआयने या संदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे.

प्रणव मुखर्जी यांची १० ऑगस्टपासून प्रकृती बिघडली आहे. १० तारखेच्या एक दिवस आधीच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. तसंच १० ऑगस्ट रोजी त्यांच्या मेंदूत असलेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत अद्याप काहीही सुधारणा झालेली नाही. दरम्यान, आता ते कोमात गेले आहेत, असं आर्मी रुग्णालयाने स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

आज सकाळीच प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर काही अफवा पसरवल्या गेल्या. ज्यानंतर प्रणव मुखर्जी यांच्या मुलाने अभिजित मुखर्जी यांनी ट्विट करुन माझे वडील प्रणव मुखर्जी सुखरुप आहेत त्यांच्याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अशी माहिती दिली.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -