Coronavirus: कनिकाच्या पार्टीमधल्या दोघांची टेस्ट आली निगेटिव्ह

Mumbai
kanika kapoor 162 people came in contact with singer 63 people coronavirus covid 19 test negative
Coronavirus: कनिकाच्या संपर्कात आले होते १६२ जण, आतापर्यंत ६३ जणांचे आले रिपोर्ट

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिक कपूरला करोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी ती लंडनहून परत आली होती. शुक्रवारी कनिका कपूरची करोना चाचणी केल्यानंतर पॉझिटिव्ह रिपोर्ट आले होते. सध्या तिला लखनऊमधील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीतील हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मीडियाच्या माहितीनुसार, कनिका कपूरला करोनाची लक्षणे असून सुद्धा तिने एका हॉटेलमध्ये डिनर पार्टी करत होती. या पार्टीत ५०० पाहुणे उपस्थित असल्याचं समोर आलं आहे. या पार्टीमध्ये राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांचे पुत्र भाजपचे खासदार दुष्यंत सिंहसुद्धा उपस्थित होते. त्यामुळे करोनाग्रस्त असलेल्या कनिक कपूरच्या संपर्कात आल्यामुळे या मायलेकांनाही क्वारंटाईन केलं होते. आज या दोघांची करोना चाचणी करण्यात आली. मात्र या दोघांच्याही करोना चाचणीचे निगेटिव्ह रिपोर्ट आले असल्याचं समोर आलं आहे.


नक्की वाचा – अक्कलशून्य आत्मविश्वास!


राष्ट्रपती देखील करोना चाचणी करणार 

कनिकाला करोना लागण झाल्यामुळे तिच्या पार्टीत ५००हून अधिक पाहुण्यांचा शोध आरोग्य विभागाला आता घ्यावा लागणार आहे. तसंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे खासदार दुष्यंत सिंह हे पार्टी झाल्यानंतर अनेक वेळा लोकसभेतही उपस्थित राहिले होते. याशिवाय ते राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी आयोजित केलेल्या बैठकीतही दुष्यंत सिंह सहभागी झाले होते. त्यामुळे आता हे मायलेक कोणा कोणाच्या संपर्कात आले आहेत त्यांचा देखील आता शोध घ्यावा लागणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोंविद देखील आता करोना चाचणी करणार असल्याचं बोललं जात आहे.


हेही वाचा – Coronavirus: कनिका म्हणते, ‘मला रुग्णालयात धमकावलं जातंय’