CoronaVirus: बापरे! केरळमध्ये वेगाने वाढतोय करोनाग्रस्तांचा आकडा!

देशभरात सर्वाधित करोनाचे रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत.

Thiruvananthapuram
found 137 coronavirus positive patient in kerala
CoronaVirus: बापरे! केरळमध्ये वेगाने वाढतोय करोनाग्रस्तांचा आकडा!

सध्या देशभरात करोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. देशातील करोनाग्रस्तांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत देशात ७२२ करोनाचे रुग्ण आढळले आहेत. कालपर्यंत देशात करोनाचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले होते. मात्र आज पाहायला गेले तर केरळमध्ये करोनाग्रस्ताचा आकडा झपाट्याने वाढल्याचं दिसत आहे. आतापर्यंत केरळमध्ये करोनाग्रस्तांची संख्या १३७वर पोहोचली आहे. तर महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १३०वर पोहोचली आहे. केरळमध्ये सर्वाधिक करोनाचे रुग्ण कासारगोड येथे आढळले आहेत. तर राज्यात मुंबईमध्ये सर्वाधिक करोनाचे रुग्ण आढळले आहेत. करोनामुळे केरळमध्ये अजूनही एकाचाही बळी गेलेला नाही. मात्र महाराष्ट्रात करोनामुळे ५ जणांना मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत देशभरात ७२२ करोनाचे रुग्ण असून त्यापैकी १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच ५० करोनाचे रुग्ण व्हायरस फ्री झाले आहेत.

आतापर्यंत केरळ मधील करोनाग्रस्तांची आकडेवारी

थ्रिसुर – ५
अलाप्पुझ्हा – २
कासारगोड – ४८
पाठनाम्ठीत्ता – १२
कन्नूर – २३
एर्नाकुलम – १९
कोट्टायम – ३
तिरुवनंतपुरम -५
इडुक्की – ३
मलप्पुरम – ८
कोझ्हीकोडे – ५
पलक्कड – ३
वायनाड – १
एकूण – १३७

आतापर्यंत महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची आकडेवारी

पिंपरी चिंचवड मनपा – १२ 
पुणे मनपा – १९ 
मुंबई – ४९ 
सांगली – १२ 
नवी मुंबई – ६
कल्याण डोंबिवली – ६ 
नागपूर – ५ 
यवतमाळ – ४ 
अहमदनगर, ठाणे प्रत्येकी – ३ 
सातारा, पनवेल प्रत्येकी – २ 
उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई विरार,पुणे ग्रामीण, सिंधुदुर्ग, कोल्हापूर प्रत्येकी – १


हेही वाचा – करोनानंतर महाराष्ट्रात अवकाळी पावसाची चिंता!


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here