घरदेश-विदेशदिल्लीत कंपनीला भीषण आग; ४ कामगारांचा मृत्यू

दिल्लीत कंपनीला भीषण आग; ४ कामगारांचा मृत्यू

Subscribe

दिल्लीतल्या करोल बाग परिसरामध्ये कंपनीला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहे.

राजधानी दिल्लीमध्ये करोल बाग परिसरामध्ये एका कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. सोमवारी दुपारी १२ वाजता ही घटना घडली असून या आगीमध्ये ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. कंपनीला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळावर धाव घेतली. दरम्यान आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

- Advertisement -

केमिकल पडल्याने लागली आग

दिल्लीच्या करोल बाग परिसरातील बीडनपुर भागामध्ये असणाऱ्या एका कंपनीला भीषण आग लागली. दरम्यान ही आग केमिकल पडल्याने लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ही आग ऐवढी भीषण होती की या आगीमध्ये कंपनीमध्ये काम करणाऱ्या ४ कामगारांची मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -