घरदेश-विदेशट्रम्प समर्थक घुसले अमेरिकन संसदेत

ट्रम्प समर्थक घुसले अमेरिकन संसदेत

Subscribe

गोळीबारात चार जणांचा मृत्यू

अमेरिकेच्या संंसदीय इतिहासात प्रथमच २०० वर्षांनंतर हिंसाचार उफाळला. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसदेच्या इमारतीत घुसून सभागृहाचा ताबा घेतला. यावेळी झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

अमेरिकेसह संपूर्ण जग या घटनेमुळे हादरून गेले आहे. या हिंसाचारानंतर रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांकडून डोनाल्ड ट्रम्प यांना २० जानेवारीपूर्वीच राष्ट्राध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केली आहे. ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग आणण्याची मागणी करण्यात येत आहे. ट्रम्प यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यास काही दिवसांचा अवधी असला तरी त्यांच्या या कृत्यासाठी त्यांना पदावरून हटवण्याची आवश्यकता असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाची तयारी सुरू करण्यात आली आहे. ट्रम्प यांना हटवण्यासाठी आवश्यक संख्याबळ आहे का, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, महाभियोगाने ट्रम्प यांना पदावरून हटवल्यानंतर सिनेट त्यांच्यावर कारवाई करू शकते. ट्रम्प यांना भविष्यात कायमस्वरूपी अपात्र ठरवण्यात येऊ शकते. ट्रम्प यांना २०२४ ची निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकेतील संविधानानुसार, उपराष्ट्रपती माइक पेन्स आणि कॅबिनेटला बहुमताने ट्रम्प यांना पदावरून हटवण्यासाठी मतदान करावे लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -