घरदेश-विदेशजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात चार पोलीस शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात चार पोलीस शहीद

Subscribe

जम्मू-काश्मीरच्या शोपियनमध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य केले आहे. गस्तीवर जाणाऱ्या पोलीसांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये ४ पोलीस शहीद झाले असून १ पोलीस गंभीर जखमी झाला आहे.

जम्मू-काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यामध्ये बुधवारी दुपारी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये ४ पोलीस शहीद झाले आहेत. शोपियन जिल्ह्यातील अरहामा येथे पोलिसांच्या गाडीवर हा दहशतवादी हल्ला करण्यात आहे. या हल्ल्यामध्ये ४ पोलीस शहीद झाले तर एक गंभीर जखमी झाला आहे. जखमी पोलिसावर उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

तीन एके-४७ घेऊन दहशतवादी फरार

बुधवारी दुपारी गस्तीवर निघालेल्या पोलिसांची गाडी अचानक बिघडली. त्यामुळे गाडी दुरुस्तीसाठी सर्व पोलीस रस्त्याच्या कडेला उभे होते. त्यावेळी गाडीवरुन आलेल्या दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार गेला. या गोळीबारात ४ पोलीस शहीद झाले तर एक पोलीस गंभीर जखमी झाले. या हल्ल्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेत परिसराला घेराव घातला आहे. शोपियन जिल्ह्यातील अराहाम भागामध्ये ही घटना घडली. या हल्ल्यानंतर तीन एके-४७ बंदूक घेऊन दहशतवादी फरार झाले.

- Advertisement -

दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्विकारली

दहशतवाद्यांनी यावेळी पोलिसांना लक्ष्य करत हा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ६ पोलीस गंभीर जखमी झाले होते. जखमी पोलिसांनी ताबडतोब नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान ४ जवानांनी प्राण सोडले. तर एका जवानावर सध्या उपचार सुरु आहेत. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद आणि हिज्ब-उल-मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.

अनंतनागमध्ये दोन दहशतवादी ठार

अनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले होते. हिज्बुल या दहशतवादी संघटनेचे हे दोन दहशतवादी होते. हिज्बुल कमांडर अल्ताफ अहमद डार उर्फ अल्ताफ कचरु आणि त्याचा सहकारी उमर राशिद यांना ठार करण्यात जवानांना यश आले. हिज्बुल मुजाहिद्दीन या संघटनेचा हा दहशतवादी कुलगाममध्ये कमांडरच्या रुपाने काही वर्षापासून जवानांना लक्ष्य करत होता. अल्ताफ अहमद डार हा घाटीमध्ये बुरहानची जागा घेऊ इच्छित होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -