घरदेश-विदेशकोरोनाचं नवं रूप! चार वेळा निगेटिव्ह आल्यानंतरही शरिरात आढळले अँटीबॉडी

कोरोनाचं नवं रूप! चार वेळा निगेटिव्ह आल्यानंतरही शरिरात आढळले अँटीबॉडी

Subscribe

अ‍ॅटीबॉडी रुग्णाच्या शरीरात संक्रमणाविरूद्ध कार्य करतात

देशात प्रथमच कोरोना विषाणूचे एक नवीन रूप समोर आले आहे. दिल्लीतील देशातील सर्वात मोठ्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) मध्ये दाखल झालेल्या रूग्ण चार वेळा कोरोना निगेटिव्ह असूनही त्याच्या शरीरात कोरोना विषाणूविरूद्ध अ‍ॅटीबॉडीज मिळाले आहे. जेव्हा कोरोना विषाणूची लागण होते तेव्हाच मानवी शरीरात हे अ‍ॅटीबॉडी तयार होऊ शकते. अ‍ॅटीबॉडी तयार होण्यास सुमारे पाच ते सात दिवस लागतात. हे अ‍ॅटीबॉडी रुग्णाच्या शरीरात संक्रमणाविरूद्ध कार्य करते.

असा घडला प्रकार

दिल्ली एम्सच्या जेरियाट्रिक विभागात गेल्या काही दिवसांपासून एक महिला रूग्णालयात दाखल होती. ८० वर्षांची वृद्ध महिला कित्येक दिवसांपासून मधुमेह, उच्च रक्तदाब आणि अशक्तपणाने १५ दिवसांपासून ग्रस्त होती. या महिलेत टीएलसीची संख्या कमी होत होती. डॉक्टरांना संसर्गाचा संशय असल्याने १२ दिवसात चार वेळा आरटी-पीसीआरद्वारे कोरोना विषाणूची चाचणी घेण्यात आली, परंतु आश्चर्याची बाब म्हणजे, एकाही चाचणीत या संसर्गाची पुष्टी होऊ शकली नाही. या सर्व चाचण्या दिल्ली एम्सच्या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज प्रयोगशाळेत घेण्यात आल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

अमर उजालाने दिलेल्या माहितीनुसार, वारंवार येणारे अहवाल निगेटिव्ह असल्याने तसेच रूग्णातील लक्षणे सारखीच असल्याने डॉक्टरही गोंधळात पडले. यानंतर, डॉक्टरांनी या रूग्णाला संक्रमित असल्याचे मानून पाचव्यांदाअँटीबॉडीजची चाचणी घेतली. या चाचणीत, रुग्णाच्या आत कोरोना विषाणूचे अँटीबॉडीज आढळले. नुकतेच, यूकेच्या रूग्णाला डॅक्सॅमेथासोन औषधाची परवानगी मिळाल्यानंतर १० दिवस एम्सच्या डॉक्टरांना या रुग्णाला देखील डॅक्सॅमेथासोन दिले असून ते उपचारात प्रभावी असल्याचे दिसून आले.

लक्षणं नाहिसे झाल्यावर दिला डिस्चार्ज

डॉ. गुर्जर म्हणाले की, सध्या ७ जुलै रोजी या रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला असून प्रकृती सुधारत आहे. तर त्या रुग्णांत कोणतीही लक्षणे न दिसल्यामुळे रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बर्‍याच लोकांचा पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतरही तो निगेटिव्ह येतो. आणि त्यांच्यामध्ये कोरोना विषाणूचा कोणताही परिणाम नाही.


हवेतून पसरणाऱ्या कोरोनाच्या ‘एअरबोर्न’चा बंदोबस्त करणार ‘एअर फिल्टर’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -