घरदेश-विदेशमसूद अझहरची संपत्ती जप्त; फ्रान्सची मोठी कारवाई

मसूद अझहरची संपत्ती जप्त; फ्रान्सची मोठी कारवाई

Subscribe

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरच्या विरोधात फ्रान्सने मोठी कारवाई केली आहे. मसूदची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय फ्रान्सने घेतला आहे.

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरच्या विरोधात फ्रान्सने मोठी कारवाई केली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेत मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याच्या प्रस्तावावर चीनने आडकाठी आणली. त्यामुळे मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवता आले नाही. मसूदला बंदी घालण्याच्या प्रस्तावावर चीनने व्हिटोचा वापर केल्यानंतर फ्रान्सने मसूदची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनने मसूदचे पाठराखण केल्यामुळे अमेरिका आणि फ्रान्सने चीनवर जोरदार टीका केली आहे.

हेही वाचा – मसूद अझहरचा मृत्यू

- Advertisement -

मसूदचे नाव ईयुच्या दहशतवाद्यांच्या यादीत

चीनने आडकाठी निर्माण केल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेत मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवता आले नाही. परंतु, मसूद अझहरचे नाव युरोपीय संघाने तयार केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात येईल, असे फ्रान्स सरकारच्या गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानवरही आंतरराष्ट्रीय दबाव वाढत आहे.

हेही वाचा – मसूद अझहर पाकिस्तानातच; अखेर पाकिस्तानची कबुली

- Advertisement -

पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड मसूद

१४ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानचा दहशतवादी मसूद अझहर आहे. हा हल्ला झाल्यानंतर लगेच जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती. मसूद हा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. या हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने मसूदवर कारवाई करावी, अशी मागणी भारताने केली होती. परंतु, पाकिस्तान या दहशतवाद्यांची पाठराखण करत होते. अखेर भारताने पाकिस्तानमध्ये शिरुन एअर स्ट्राईक केले. या एअर स्ट्राईकमध्ये भारताने जैश-ए-मोहम्मदची तळे उद्धवस्त केले. यात २०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर येत होती. या सर्व घटनांनंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात सुरक्षा संबंधित घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेत आला होता. परंतु, चीनने मसूदला पाठिमागे घेतले. त्यामुळे मसूदला आंतरराष्ट्रीय ठरवता आले नाही. परंतु, फ्रान्स सरकारने मसूदच्या विरोधात कडक कारवाई केली आहे.


हेही वाचा – अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्यात नेहरुंमुळेच अपयश – भाजप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -