घरदेश-विदेशगोवा मुक्तिसंग्रामातील लढवय्ये कार्यकर्ते मोहन रानडे यांचे निधन

गोवा मुक्तिसंग्रामातील लढवय्ये कार्यकर्ते मोहन रानडे यांचे निधन

Subscribe

गोवा मुक्तिसंग्रामातील लढवय्ये कार्यकर्ते आणि स्वातंत्र्य सैनिक मोहन रानडे यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले आहे.

गोवा मुक्तिसंग्रामातील लढवय्ये कार्यकर्ते आणि स्वातंत्र्य सैनिक मोहन रानडे यांनी वयाच्या ९० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. काही महिन्यांपासून त्यांना अन्न नलिकेच्या विकाराचा त्रास सुरु होता. तसेच त्यांचे शरिरातील हिमोग्लोबीन देखील कमी झाले होते. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांची आज प्राणज्योत मालवली.

गोवा मुक्तिसंग्रामातील लढवय्ये कार्यकर्ते आणि स्वातंत्र्य सैनिक मोहन रानडे यांनी वयाच्या ९० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. काहि महिन्यांपासून त्यांना अन्न नलिकेच्या विकाराचा त्रास सुरु होता. तसेच त्यांचे शरिरातील हिमोग्लोबीन देखील कमी झाले होते. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांची आज प्राणज्योत मालवली.

- Advertisement -

मोहन रानडे यांच्याविषयी

मोहन रानडेंचा जन्म १९२९ साली महाराष्ट्रात सांगली येथे झाला. पोर्तुगीज वसाहतवादी राजवटीतून गोवा स्वतंत्र करण्यासाठी छेडलेल्या मुक्तिसंग्रामाती आझाद गोमंतक दलाचे ते प्रमुख नेते होते. सुरूवातीला व्यक्तिगत पातळीवर आणि नंतर आझाद गोमंतक दल या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी गोव्याच्या मुक्तीसाठी प्रयत्न केले. शिक्षकी पेशा स्वीकारून ते गोव्यात आले. त्यानंतर त्यांनी पोर्तुगीजांविरुध्द सशस्त्र बंड उभारले. पुढे बेती येथील पोलीस चौकीवर केलेले हल्ल्यात ते जखमी झाले आणि इ.. १९५५ मध्ये पोर्तुगीज पोलिसांच्या तावडीत सापडले. पोर्तुगालात त्यांना २६ वर्षांची सजा फर्मावली गेली. गोव्याच्या मुक्तीनंतर भारत सरकार त्यांची सोडवणूक करु शकेल असते, परंतु भारत सरकारने दुर्लक्ष केल्याने त्यांना अनेक वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. अखेर १४ वर्षांच्या तुरुंगवासानंतर जानेवारी, .. १९६९ मध्ये त्यांची सुटका झाली.

गोवा पुरस्कार सन्मानित

रानड्यांनी गोवा मुक्तिसंग्रामातील अनुभवांवर सतीचे वाण (मराठी) आणि स्ट्रगल अनफिनिश्ड (इंग्लिश), ही पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल गोवा शासनाने गोवा पुरस्कार (इ.स. १९८६), तर भारताच्या केंद्रशासनाने (इ.स. २००१) पद्मश्री देऊन गौरवले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -