घरदेश-विदेश... म्हणून फ्रान्सच्या पंतप्रधानांचा दिला राजीनामा

… म्हणून फ्रान्सच्या पंतप्रधानांचा दिला राजीनामा

Subscribe

जोपर्यंत नवीन मंत्रिमंडळाच्या नावाची घोषणा केली जात नाही, तोपर्यंत फिलिप कार्यभार सांभाळतील.

फ्रान्सचे पंतप्रधान एडवर्ड फिलिप यांनी राजीनामा दिला आहे. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या एलिसि पॅलेसने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एडवर्ड फिलिप यांच्या राजीनाम्यानंतर सरकारमधील फेरबदल अपेक्षित आहे. जोपर्यंत नवीन मंत्रिमंडळाच्या नावाची घोषणा केली जात नाही, तोपर्यंत फिलिप कार्यभार सांभाळतील. येत्या काही दिवसांत सरकारच्या फेरबदलाच्या शक्यता असताना फ्रान्सचे पंतप्रधान एडवर्ड फिलिप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. फ्रान्सच्या राष्ट्रपती कार्यालयाने शुक्रवारी राजीनामा जाहीर केला. फिलिप यांची जागा दुसरा कोणता नेता घेईल किंवा त्या जागेवर नव्या सरकारचे प्रमुख म्हणून तेच कायम राहतील, असे या निवेदनात अद्याप स्पष्ट केले नाही.

फ्रान्सचे पंतप्रधान एडवर्ड फिलिप यांनी कोरोना व्हायरसमुळे राजीनामा दिला आहे. इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या सरकारमध्ये ते मागील ३ वर्षांपासून पंतप्रधान होते. फ्रान्समधील कोरोना व्हायरसमुळे आलेल्या आर्थिक संकटाच्या कारणामुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा सुरू आहे की, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे मंत्रिमंडळात फेरबदल करू शकतात. हे फेरबदल अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉनची स्वतःची विश्वासार्हता वाढवणार होते आणि पुन्हा निराश झालेल्या मतदारांची मने जिंकतील. कोरोना संकटाच्या वेळी पंतप्रधान एडवर्ड फिलिप यांच्यावर जोरदार टीका देखील झाली होती.

- Advertisement -

दरम्यान, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी एडवर्ड फिलिप यांचा राजीनामा स्विकारला आहे. राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी सांगितले की, पुढील काही तासांमध्ये नवीन पंतप्रधानाच्या नावाची घोषणा केली जाईल. काही दिवसांपुर्वी पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत पराभव झाल्याने हा निर्णय घेतला गेल्याचे देखील सांगितले जात आहे. मॅक्रॉन पुढील २ वर्षात आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत.


PM Modi Leh Visit : मोदींनी जवानांशी साधला संवाद, थेट चीनला दिला इशारा!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -