टिकटॉकचा व्हिडिओ करणं पडलं महागात, मित्रावरच झाडली खरी गोळी

या घटनेनंतर बारखांबा पोलीस ठाण्यात खूणाचा गुन्हा तसेच अवैध शस्त्र कायद्यान्वे एक गुन्हा दाखल करण्यात आला. १९ वर्षाीय तरूणासह त्याच्या मित्रांनाही अटक करण्यात आले आहे.

Mumbai
टिकटॉकचा व्हिडिओ करणं पडलं महागात, मित्रावरच झाडली खरी गोळी

मोबाईलमधील टिकटॉकवर व्हिडिओ तयार करण्यासाठी चक्क १९ वर्षीय तरूणाने खऱ्या पिस्तुलाचा वापर करून आपल्या मित्रावरच गोळ्या झाडल्या. रविवारी रात्री सलमान झाकीर सोबत त्याचे मित्र सोहील आणि अमीर इंडीया गेटकडे जात होते. तेथून परतताना सोहील सलमान सोबत क्रेटा कारच्या पुढच्या सीटवर बसला होता. त्यावेळी सलमान गाडी चालवत असताना देशी पिस्तुल बाहेर काढले आणि टिकटॉक व्हिडिओ बनवण्याच्या नादात त्याने पुढे बसलेल्या मित्रालाच लक्ष्य केले. त्या डाव्या गालावर गोळीचा निशाणा धरत गोळी झाडली.

त्यापैकी त्यांचा एक मित्र अमीर हा कारमध्ये मागे बसला होता. ही घटना दिल्लीतील रंजीतनगर पुलाजवळ घडली. या प्रसंगानंतर त्यापैकी दोघे मित्र घाबरून जवळ असणाऱ्या सोहीलच्या नातेवाईकांकडे गेले. तेथे जाऊन त्यांनी त्याचे रक्ताळलेले कपडे बदलले. नंतर सलमानला त्याच्या नातेवाईकांनी जवळच्या LNJP हॉस्पिटलमध्ये ११.१५ वाजेच्या सुमारास दाखल केले. परंतु तोपर्यंत डॉंक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते.

या घटनेनंतर बारखांबा पोलीस ठाण्यात खूणाचा गुन्हा तसेच अवैध शस्त्र कायद्यान्वे एक गुन्हा दाखल करण्यात आला. १९ वर्षाीय तरूणासह त्याच्या मित्रांनाही अटक करण्यात आले आहे. सोहीलला गोळी झाडली म्हणून अटक करण्यात आली. तसेच अमीरला देखील याप्रकरणात पोलिसांनी अटक केले आहे. सलमान हा जफराबाद येथे राहणारा होता. सलमानचा मृतदेह हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात आला असून सोमवारी त्याचे पोस्ट मॉर्टम करण्यात येणार आहे. तसेच, या प्रकरणात गोळी चुकून झाडण्यात आली की हा हत्या करण्याचा प्रकार आहे. याबाबत पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.