सामान्य जनता त्रस्त; इंधन दरवाढ कायम

मुंबईमध्ये आज पेट्रोल ०.१७ पैशांनी वाढले असून, पेट्रोलचा भाव ७६.३५ रुपये प्रतिलिटर इतका आहे.

Mumbai
Today's petrol rates

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये सातत्याने होणाऱ्या दरवाढीचा परिणाम, देशातील इंधनाच्या दरावरही होतो आहे. क्रूड ऑईलच्या वाढत्या दरामुळे दिल्लीसह देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीची मालिका सुरुच आहे. आज (शनिवारी) दिल्लीमध्ये पेट्रोल ०.१७ पैशांनी महागले असून, डिझेलच्या दरात ०.१९ पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे राजधानीमध्ये आज पेट्रोलचा भाव ७०.७२ रुपये प्रतिलिटरवर तर, डिझेलचा भाव ६५.१६ प्रतिलिटरवर जाऊन पोहचला आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत सुरु असलेल्या या दरवाढीचा फटका देशातील वाहनचालकांना आणि सामान्य नागरिकांना बसत आहे.

दिल्लीसह मुंबई शहरातही आज इंधन दरात वाढ झाली आहे. मुंबईमध्ये आज पेट्रोल ०.१७ पैशांनी वाढले असून, पेट्रोलचा भाव ७६.३५ रुपये प्रतिलिटर इतका आहे. तर, डिझेल ०.२० पैशांनी वाढले असून मुंबईत आज डिझेलचा भाव ६८.२२ रुपये प्रतिलिटर इतका आहे. दिल्लीतील दरांच्या तुलनेत आज मुंबईत पेट्रोलचा दर काही अंशी कमी तर डिझेलचा दर काही अंशी जास्त आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली ही इंधन दरवाढ, देशातील सर्वसामान्य नागरिकांची आणि वाहनचालकांची अजून किती परीक्षा पाहणार? याचं काहीच ठोस उत्तर देता येणार नाही. मात्र, यामुळे देशातील जनता त्रस्त झाली आहे हे मात्र नक्की.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here