घरदेश-विदेशपेट्रोलची किंमत वाढता वाढता वाढे...

पेट्रोलची किंमत वाढता वाढता वाढे…

Subscribe

सातत्याने होत असलेल्या पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सोमवारी सलग पंधराव्या दिवशी ही वाढ सुरूच आहे. सोमवारी पेट्रोलच्या किंमतीत १५ पैशांची वाढ झाली. त्यामुळे पेट्रोलने प्रतिलिटर ८६ रूपयांचा आकडा पार केला. तर डिझेलची किंमत ७३.६४ रूपये झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा सरकारविरोधातील रोष वाढत आहे. हा रोष नेटीझन्स सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत.

सोशल मीडीयावर पेट्रोल दरवाढीविरोधात जोक्सचा पाऊस पडत आहे. एका तरूणाने त्याच्या दुचाकीचे अंत्यसंस्कार केले असल्याचे फोटो शेअर केले आहेत. अनेकांनी पेट्रोलच्या वाढत्या किंमतींची तूलना हनुमानाच्या शेपटीसोबत केली आहे.

- Advertisement -

पेट्रोलच्या किंमती
दिल्ली – ७८.२७
कोलकाता – ८०.९१
चेन्नई – ८१.२६
मुंबई – ८६.०८

डीझेलच्या किंमती
दिल्ली – ६९.१७
कोलकाता – ७१.७२
चेन्नई – ७३.०३
मुंबई – ७३.६४

- Advertisement -

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम होऊन महागाई वाढते. मुलभूत वस्तुंच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढतात. सामान्य नागरिकांना यामुळे मोठा मन:स्ताप सहन करावा लागतो.


भारताची इंधनाची गरज भागवण्यासाठी सरकारला ८० टक्के कच्चे तेल आयात करावे लागते. त्यामुळे देशात इंधनाचे दर जास्त आहेत. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करणे शक्य व्हावे यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी शुल्कात कपात करण्याची मागणी तेल मंत्रालयाने केली होती. परंतु १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही मागनी फेटाळली. सर्वच दक्षिण आशियाई देशांच्या तूलनेत भारतात इंधनाचे दर ४० टक्क्यांनी जास्त आहेत.

पेट्रोल ४५ रूपये आणि डिझेल ३५ रूपये होणार!
इंधनांच्या किंमती नियंत्रणात याव्या याकरिता सरकार काहीच प्रयत्न करत नसल्याने पेट्रोल आणि डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तमिळनाडुमधील मदुराई येथील केके रमेश यांनी मदुराई जिल्हा न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. याचिकेत पेट्रोल आणि डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी मांडली आहे. जीएसटीअभावी इंधनांच्या किंमती वाढत असल्याचे रमेश यांचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -