घरदेश-विदेशपोरं नापास; कॉलेज भकास; संस्थाचालक उदास

पोरं नापास; कॉलेज भकास; संस्थाचालक उदास

Subscribe

दहावीत नापास मुलांमुळे महाविद्यालयांतील ११ वीचे वर्ग ओस पडण्याची शक्यता आहे, अशा अनेक विना अनुदानित तुकड्या बंद होण्याची शक्यता असून शिक्षण संस्थाचालक हैराण आहेत.

यंदाच्या वर्षी माध्यमिक शालांत परीक्षा मंडळ अर्थात एसएससी बोर्डाने घेतलेल्या 10 वीच्या परीक्षेचा निकाल खूपच कमी लागला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात 10 वी उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 21 हजाराने कमी झाली आहे. या पाश्र्वभूमीवर विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 11 वीच्या वर्गातील 21 हजार जागा रिक्त राहाणार असल्याने अनेक ठिकाणी 11 वी च्या तुकड्या बंद पडण्याची शक्यता आहे.

मागील वर्षी देखील नगर जिल्ह्यात दोन उच्च माध्यमिक शाळा बंद करण्याची वेळ आली होती. यंदा तर 11 वी च्या तब्बल 27 टक्के जागांवर प्रवेशच होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार गुरूवार पासून नगर जिल्ह्यात 11 वी ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

- Advertisement -

नगर जिल्ह्यात विविध शाळांमधील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मिळून एकूण 372 शाळांमध्ये एकूण 920 तुकड्या आहेत.या सर्व ठिकाणी 11 वी साठी 79 हजार 440 इतकी प्रवेश क्षमता आहे. 2018-19 या शैक्षणिक वर्षात नगर जिल्ह्यात 73 हजार 376 विद्यार्थ्यांनाी 10 वी ची परीक्षा दिली होती. मात्र त्यापैकी अवघे 58 हजार 336 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

उत्तीर्ण झालेल्यांपैकी अनेक विद्यार्थी डिप्लोमा, आयटीआय,अशा वेगवेगळ्या अभ्याक्रमांना प्रवेश घेतात.तर काही विद्यार्थी वेगवेगळ्या कारणांनी 10 वी नंतर शिक्षणच घेत नाहीत.जिल्ह्यातील 920 तुकड्यांमध्ये एकूण प्रवेश क्षमता 79 हजार 440 इतकी आहे. 11 वी ची एक तुकडी नियमित सुरू राहाण्यासाठी किमान 40 विद्यार्थी संख्या असणे आवश्यक आहे. शहरासहीत काही ठराविक महाविद्यालयांमध्ये प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होताना दिसते.

- Advertisement -

मात्र यंदाच्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्याच 21 हजाराने कमी झालेली असल्याने अनेक ठिकाणी विशेषत: विनाअनुदानित तुकड्या बंद होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात विविध महाविद्यालयांमध्ये 260 विनाअनुदानित व 101 स्वयं अर्थ सहाय्यित तुकड्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -