राजस्थानमध्ये विवाहीत महिलेवर गँगरेप झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाली जिल्ह्यातील एका विवाहित महिलेवर पाच जणांनी आळीपाळीने बलात्कार केला. आरोपींनी बलात्काराचा व्हिडिओ तयार करुन सोशल मीडियावर अपलोड केला. याप्रकरणी सोमवारी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी ५ पैकी ४ आरोपींना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेवर २६ मे रोजी ५ जणांनी गँगरेप केला. त्याचा व्हिडिओ तयार करुन तो सोशल मीडियावर व्हायरल केला. या धक्कादायक घटनेमुळे राजस्थानमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Rajasthan: 4 arrested in Pali for gang-raping a woman on 26 May in Mama Nadi area under Industrial Police Station limits. Police say, “She registered a compliant y’day. Accused identified as Jitendra, Govind, Dinesh, Mahendra & Sanjay. We’ll arrest the absconding accused soon.” pic.twitter.com/ZfLqVO2OqN
— ANI (@ANI) June 4, 2019
अशी घडली घटना ?
राजस्थानच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी किशोर सिंह भाटी यांनी सांगितले की, ५ आरोपींविरोधात रविवारी गँगरेप, छेडछाड आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी ५ पैकी ४ आरोपींना अटक केली. जितेंद्र भाट (२० वर्ष), गोविंद भाट (२० वर्ष), दिनेश भाट (२४ वर्ष) आणि महेंद्र भाट (२२ वर्ष) या ४ आरोपींना सोमवारी अटक केली. तर पाचवा आरोपी संजय भाट हा फरार असून त्याचा शोध सुरु आहे.
महिन्यापूर्वी घडली होती अशीच घटना
पोलिसांनी सांगितले की, आरोपींची चौकशी केल्यानंतर त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आले. तर पीडित महिलेला वैद्यकिय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. महिलेचा पती मजूर आहे. दरम्यान, या घटनेच्या एक महिना आधी २६ एप्रिलला राजस्थानच्या अलवरमध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती. एका महिलेवर काही जणांनी तिच्या नवऱ्यासमोरच गँगरेप केला होता. निवडणुकीमुळे या घटनेवर राजस्थान पोलिसांनी कारवाईला उशीर केल्यामुळे मोठा गदारोळ झाला होता.
हेही वाचा –