घरक्राइमहैदराबादमध्ये पुन्हा खळबळ, ३० वर्षीय महिलेची सामुहिक बलात्कार करून हत्या

हैदराबादमध्ये पुन्हा खळबळ, ३० वर्षीय महिलेची सामुहिक बलात्कार करून हत्या

Subscribe

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हैदराबादमध्ये एका महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार करून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या घटनेमुळे आख्ख्या देशात संतापाची लाट उसळली होती. काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशच्या हथरसमध्ये झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू देखील देशभरात क्रोध निर्माण करणारा ठरला. त्यात आता हैदराबादमध्येच पुन्हा एकदा सामुहिक बलात्कार आणि हत्येचा भीषण घटना घडल्यामुळे पुन्हा एकदा देशात संताप व्यक्त केला जात आहे. हैदराबादच्या सीमावर्ती भागात असलेल्या कोल्लूरमध्ये गुरुवारी एका ३० वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला. या महिलेवर सामुहिक बलात्कार करून नंतर तिची हत्या केल्याचा पोलीस तपासात समोर आलं आहे. या प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी अपहरण, सामुहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

आरके पुरमजवळच्या कोल्लूरमध्ये या महिलेचा मृतदेह सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३ संशयित आरोपींनी या महिलेचं अपहरण करून तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. नंतर तिची हत्या करून तिचा मृतदेह निर्जन स्थळी टाकला. पीडित महिला दोन मुलांची आई होती. १० वर्षांपासून तिचा पतीसोबत घटस्फोट झाला होता. तेव्हापासून ती दोघा मुलांसोबत वेगळी राहात होती. दोन दिवसांपूर्वी तीन जणांनी महिलेचं आर के पुरममधून अपहरण केलं होतं. पीडिता यावेळी तिच्या कामावरून तिच्या घरी परत जात होती.

- Advertisement -

ग्रामस्थांना गुरुवारी सकाळी पीडित महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर त्यांनी पोलिसांना त्यासंदर्भात माहिती दिली. पोलिसांनी तातडीने महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवला आणि आरोपींचा शोध सुरू केल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -