घरदेश-विदेशफेसबुकवर विकला जातोय गांजा

फेसबुकवर विकला जातोय गांजा

Subscribe

हैद्राबाद येथे एकाला अटक, गांजा ओढतांनाचे फोटो पोस्ट करुन तरुण विकत होता गांजा आणि एमडी.

सोशल मीडियाच्या वाढत्या वापरा बरोबरच त्याचा गैरवापर केला जात आहे. व्हॉट्सअॅप,फेसबुक आणि इन्स्ट्राग्राम यावर रोज हजारो युजर्स जोडले जात आहेत. या युजर्समध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. हा तरुण वर्ग सोशल मीडियावर जास्त वेळ अॅक्टिव्ह असतो. अशा तरुणांना अंमली पदार्थाच्या आहारी नेऊन पैसे कमवणाऱ्याला हैद्राबादवरुन अटक करण्यात आली आहे. आरोपी तरुणाने फेसबुकवर अंमली पदार्थांचे फोटो पोस्ट करत होता. अंमली पदार्थ विकत घ्यायचे असल्यास इनबॉक्समध्ये मॅसेज करण्याच्या पोस्टही त्याने आपल्या खात्यावर केल्या होत्या. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर या तरुणाला पकडण्यात आले. याच्या जवळून १५ ग्रॅम कोकेन, ८० ग्रॅम सुखा गांजा आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. कौस्टव असे या तरुणाचे नाव असून तो मूळ बंगाल येथील रहिवाशी आहे. हैद्राबाद येथील हुमायूनगर क्षेत्रातील सरोजिनी देवी रुग्णालयाजवळ गांजा विकताना याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

‘मॉली’ नावाने डिलरची ओळख

ऑनलाईन अंमली पदार्थ विकण्यासाठी कौस्टवने आपली ओळख लपवण्यासाठी स्वतःचे नाव ‘मॉली’ ठेवले होते. मॉली मागील काही महिन्यांपासून अंमली पदार्थांची तस्करी करत होता. तो स्वतः अंमली पदार्थाचे सेवन करत असून ते फोटो फेसबुकवर पोस्ट केले. अंमली पदार्थाचे सेवन करण कस चांगल आहे अशा प्रकारचे कॅप्शन त्याने फोटो खाली दिले. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला अनेक ग्राहक मिळले असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. अंमली पदार्थांना विकण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणे अशी पहिलीच घटना हैद्राबाद येथे घडली आहे.

- Advertisement -
Molly
मॅलीचे फेसबुक अकाऊंट

पोलिसांसमोरील मोठं आव्हान

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या अशा अंमली पदार्थ विक्रेत्यांना आळा घालने पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. सोशल मीडियावर लाखो युजर्स असल्यामुळे अशा युजर्सला ट्रेस करने कठीन आहे. सोशल मीडियाच्या वापरामुळे तरुण अंमली पदार्थाच्या आहारी जाऊ शकतात. त्यामुळे सोशल मीडिया वापरताना काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -