घरदेश-विदेशउन्नावमध्ये हिंदुस्तान पेट्रोलिअमच्या गॅस प्लांटमध्ये स्फोट; गावांना सतर्कतेचा इशारा

उन्नावमध्ये हिंदुस्तान पेट्रोलिअमच्या गॅस प्लांटमध्ये स्फोट; गावांना सतर्कतेचा इशारा

Subscribe

या स्फोटानंतर आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वॉल्व्ह लीक झाल्याने प्लांटमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली आहे.

उत्तरप्रदेशमधील उन्नाव येथील दहीचौकी परिसरात हिंदुस्तान पेट्रोलिअमच्या गॅस प्लांटमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळातच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या स्फोटानंतर आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वॉल्व्ह लीक झाल्याने प्लांटमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा

हिंदुस्तान पेट्रोलिअमच्या प्लांटमध्ये स्फोट होताच आग लागली. या घटनेवेळी अनेक जण प्लांटमध्ये काम करत होते. त्यामुळे हे कर्मचारी आतमध्येच अडकले असण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या घटनेनंतर उन्नाव येथील दहीचोती परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या परिसरातील आसपासच्या ५ किमी पर्यंतच्या गावांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. गरज भासल्यास गावे रिकामी करावी लागतील अशा सूचना येथील ग्रामस्थांना देण्यात आल्या आहेत.

उन्नाव, कानपूर आणि लखनऊमधून मदतकार्य

घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लखनऊवरून फोम टेंडर्स पाठवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे उन्नाव, कानपू्र आणि लखनऊमधून देखील मदतकार्य करण्यात आले आहेत. या ठिकाणचे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कार्य सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -