घरदेश-विदेशगुगलवर उल्कावृष्टीचा नजराणा

गुगलवर उल्कावृष्टीचा नजराणा

Subscribe

आज गुगलने अवकाशात उल्कांचा वर्षाव करणारे खास डुडल तयार केले आहे.

गुगलवर सातत्याने बदलणारे खास डुडल प्रत्येक नेटकऱ्यांच्या आकर्षणाचा बिंदू ठरत आहे. आज गुगलने आकाशात उल्कांचा वर्षाव करणारे खास डुडल तयार केले आहे. आजपर्यंत पृथ्वीवर सुमारे १५० उल्का पडून सरोवर निर्माण झाले आहे. दरवर्षी किमान दहा ते बारा उल्का पृथ्वीजवळून जात असतात. त्यातील एक ते दोन उल्का वगळता इतर उल्का धोकादायक नसतात. अजूनही काही उल्का पृथ्वीच्या सभोवती प्रदक्षिणा घालत आहेत. तर त्यातील काही अत्यंत धोकादायक श्रेणीत येतात. आज आकाशात उल्कांचा पाऊस पडणार आहे. गुगलने उल्कांचे शानदार असे डुडल काढले आहे.

असे आहे आजचे गुगल डुडल

आजच्या गुगल डुडलमध्ये आकाशातील उल्कांचे दृश्य दाखवण्यात आले आहे. आजचे गुगल डुडल पाहून गुगलवर उल्कावृष्टीचा शानदार असा नजराणा पाहायला मिळत आहे. यामध्ये सूर्याचा देखील समावेश केल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

उल्का म्हणजे नेमके काय?

अवकाशातून पृथ्वीवर येऊन कोसळणाऱ्या घन पदार्थाला उल्का (मिटिऑर) असं महटले जाते. तिचा कोसळण्याचा वेग घर्षण निर्माण करतो आणि तो घन पदार्थ चमकतो. बऱ्याचदा उल्कापातांची नोद अशा पडताना दिसणयातून आणि लगेच जमिनीवर पडलेल्या गोळा करण्यातून होत असते. अशा प्रकारच्या नोंदींना ‘फॉल’ असे देखील म्हटले जाते. उल्का कोसळल्यावर मात्र ती बरीचशी दगडासारखी दिसते म्हणून तिला उल्कापाषाण किंवा अशनी असं देखील संबोधले जाते. असे उल्कापाषाण उल्कापातावेळी पडताना दिसले नाहीत पण तो नंतर जमिनीवर सापडले तर त्या उल्कापाताच्या नोंदीस ‘फोइंड’ असं म्हणतात.

आज उल्कांचा वर्षाव होणार

दरवर्षी आकाशात होणाऱ्या उल्कांच्या वर्षावाचा सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. १३ डिसेंबर रोजी मध्यरात्री आवकाशात उल्कांचा वर्षाव दिसणार आहे. उल्कांच्या वर्षावाला ‘जेमिनिड मीटियोर शॉवर’ असे देखील म्हटले जाते. प्रत्येकवर्षी डिसेंबर महिन्यात उल्कावृष्टी होते. वातावरण चांगले असल्यास ही उल्कावृष्टी पाहता येणार आहे. तर ढगाळ वातावरण असल्यास ही उल्कावृष्टी पाहता येणार नाही. आज रात्री ९ नंतर उल्कांचा वर्षाव पाहू शकता. जर तुम्हाला उल्कावृष्टी पाहायची असल्यास तुम्हाला शहराबाहेर जावे लागणार आहे.

- Advertisement -

वाचा – गुगलसाठी बनवा ‘डुडल’ आणि जिंका ५ लाख


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -