घरताज्या घडामोडीजॉर्ज फ्लॉइड यांची मुलगी म्हणाली, 'माझ्या वडिलांनी जग बदललं'; व्हिडिओ झाला व्हायरल

जॉर्ज फ्लॉइड यांची मुलगी म्हणाली, ‘माझ्या वडिलांनी जग बदललं’; व्हिडिओ झाला व्हायरल

Subscribe

जॉर्ज फ्लॉइड याला न्याय देण्यासाठी अजूनही सलग आठव्या दिवशी अमेरिकेत आंदोलन सुरू आहे.

कोरोनाच्या या महासंकटात अमेरिकेतील ४६ वर्षीय कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइड यांच्या मृत्यूनंतर देशातील ३० शहरांमध्ये हिंसक आंदोलनाला वळण लागलं आहे. दरम्यान जॉर्ज यांच्या मुलीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर जॉर्ज यांच्या मुलगी गियाना हिचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती जॉर्जचे जवळचे मित्र स्टीफन जॅक्सन सीनियरच्या खांद्यावर बसलेली दिसत आहे आणि ती ‘डॅडी चेंज्ड द वर्ल्ड’ (माझ्या वडिलांनी जग बदललं) असं म्हणताना दिसत आहे.

हा व्हिडिओ मिनियापोलिसमधील पत्रकार परिषद झाल्यानंतर करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये कॅमेऱ्यामागील एक व्यक्ती ‘डॅडी डिड वॉट?’ (वडिलांनी काय केलं?) असं विचारत आहे. त्याला उत्तर देताना गियाना म्हणाली की, डॅडी चेंज्ड द वर्ल्ड (माझ्या वडिलांनी जग बदललं).

- Advertisement -

माजी एनबीएचा खेळाडू देखील गियानाचे हे वाक्य उच्चारताना व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना माजी खेळाडू स्टीफनने लिहिलं की, ‘एकदम बरोबर गिगि ‘डॅडी चेंज्ड द वर्ल्ड’. फ्लॉइड परिवर्तन करणारे नाव आहे.’

- Advertisement -

लोकांनी हा व्हिडिओ पाहून जॉर्ज यांच्या मुलीचे कौतुक केले आहे. दुःखाच्या घटनेतही तिने आपला आत्मविश्वास कायम ठेवला, असं लोकांनी म्हटलं आहे.

मिनियापोलिसमध्ये ४६ वर्षीय जॉर्ज फ्लॉइड यांचा पोलिसांच्या कोठडीत मृत्यू झाला होता. एका गोऱ्या पोलीस अधिकाऱ्याने त्यांना अटक केली आणि त्यांच्या मानेवर आपला गुडघा दाबून धरला होता. ज्यामुळे जॉर्ज यांचा श्वास कोंडून मृत्यू झाला. या घटनेचा संतापजनक व्हिडिओ उघडकीस आल्यानंतर अमेरिकेत हिंसक आंदोलनला सुरुवात झाली. पोलीस अधिकारी डेरेक शोविनवर यांच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. जॉर्ज फ्लॉइड यांना न्याय देण्यासाठी सलग आठव्या दिवशी आंदोलन सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक शहरांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे.


हेही वाचा – अमेरिकेत सहा वर्षात पोलिसांच्या गोळीबार सात हजारांहून अधिक कृष्णवर्णीय लोकांचा मृत्यू!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -