घरदेश-विदेशगाझियाबादमध्ये दोन पत्नींसह पतीची आत्महत्या; मुलांनाही ठार केले

गाझियाबादमध्ये दोन पत्नींसह पतीची आत्महत्या; मुलांनाही ठार केले

Subscribe

दरम्यान घरगुती कारणांमुळे ही घटना घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

गाझियाबादमध्ये एका व्यक्तीने त्याच्या दोन मुलांसह इमारतीच्या ८व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने त्याच्या दोन मुलांचा गळा दाबून खून केल्याचे देखील उघडकीस आले आहे. दरम्यान घरगुती कारणांमुळे ही घटना घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

अशी घडली घटना

गुलशन वासुदेव असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने त्याच्या दोन पत्नींसह इमारतीच्या ८व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान उडी मारल्यानंतर गुलशन वासुदेव आणि त्याच्या एका पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या दुसऱ्या पत्नी गंभीर जखमी झाली. पण उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेत गुलशनसह त्याच्या दोन्ही पत्नी परवीन आणि संजना यांचादेखील मृत्यू झाला. या घटनेपूर्वी गुलशनच्या मुलांचा देखील मृत्यू झाला. रितिक आणि रितिका अशी मृत मुलांची नावे आहेत. दरम्यान गुलशनच्या घरात सुसाईड नोट सापडली असून त्याआधारे पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -