घरताज्या घडामोडीधक्कादायक! मोलकरीण स्वत:च्या लघवीने धुवायची भांडी; घटना सीसीटीव्हीत कैद

धक्कादायक! मोलकरीण स्वत:च्या लघवीने धुवायची भांडी; घटना सीसीटीव्हीत कैद

Subscribe

मोलकरीण स्वत:च्या लघवीने भांडी धुत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशमधील गाजियाबाद येथे एक धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. गाजियाबाद शहरातील इंदिरापुरम मधील ज्ञानखंड – २ याठिकाणी असलेल्या इमारतीत एक मोलकरणी काम करण्यासाठी अनेक घरांमध्ये यायची. त्यातील एका फ्लॅटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. दोन दिवसांपूर्वी या घरमालकाने ऑफिसवरुन परतल्यानंतर सहज म्हणून ते सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा त्यांना ते चित्रफित पाहून धक्काच बसला.

असा आला प्रकार उघडकीस

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याची मोलकरीण तिच्या लगवीने घरातील भांडी धूत असल्याचे दिसून आले आहे. ही महिला आधी घरातील सर्व भांडी घासून धुवून घेत होती आणि मग एका भांड्यात लघवी करुन त्यात ती भांडी धुत होती. तसेच ही मोलकरीण जवळपास दोन वर्ष या फ्लॅटमध्ये काम करत होती. त्यामुळे तिने केलेल्या या कृत्याचे फुटेज पाहून घरमालकाला देखील धक्काच बसला. या घटनेची मोलकरणीकडे विचारणा केली असता. तिने असा प्रकार केला नसल्याचे सांगितले. त्यामुळे घरमालकाने थेट पोलीस ठाणे गाठत मोलकरणीविरोधात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी तक्रारीची शहानिशा करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पोलिसांना देखील धक्काच बसला.

- Advertisement -

या घटनेबाबत इमारतीत माहिती मिळताच रहिवाशांनी संताप व्यक्त करत मोलकरणीला अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच ही महिला इतरही घरात काम करत होती. मात्र, तिने त्या घरात असे कृत्य केल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


हेही वाचा – म्हणून भीम आर्मी उतरली आंदोलनात, दिल्लीतले रस्ते ब्लॉक

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -