घरदेश-विदेशप्रियंका गांधी देशभरात प्रचार करणार - गुलाम नबी आझाद

प्रियंका गांधी देशभरात प्रचार करणार – गुलाम नबी आझाद

Subscribe

'आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी देशभर फिरणार आहेत', अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी दिली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षांतर्गत महत्त्वाचे बदल करत आहे. काँग्रेसने प्रियंका गांधी यांची पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या महासचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी देशभर प्रचार करतील, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी दिली आहे. टाम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात माहिती दिली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभेचे बजेट अधिवेशन संपल्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलवण्यात येणार आहे आणि या बैठकीत प्रियंकाच्या काँग्रेसच्या प्रचारातील सहभागाची माहिती देण्यात येणार आहे.

हेही वाचा – ‘प्रियंका गांधी फक्त दिसायला सुंदर, राजकीय कर्तृत्व नाही’

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले आझाद?

प्रियंका गांधी सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. त्या लवकरच देशात परतील आणि त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये जबाबदारी स्वीकारण्याचा औपचारीक कार्यक्रम संपन्न होईल. प्रियंकांचे कार्य फक्त उत्तर प्रदेशपर्यंत मर्यादित राहिल का? असा प्रश्न जेव्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना विचारण्यात आला तेव्हा प्रियंकाचे कार्यक्षेत्र फक्त उत्तर प्रदेशपुरता मर्यादित नसून ते आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात देशभर प्रचार करतील, असे आझाद यांनी सांगितले आहे. शिवाय, महासचिव हा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्षेत्र प्रचार समितीचा सदस्य असतो. त्यामुळे ज्या ज्या राज्यांमध्ये मागणी होईल, त्या त्या राज्यांमध्ये प्रियंका यांना प्रचाराला जावे लागेल, असे आझाद यांनी सांगितले. भारत हा भौगोलिक दृष्टीकोनाने अत्यंत मोठा देश असला कारणाने प्रचारासाठी फक्त अध्यक्षावर विसंबून न राहता, इतर नेत्यांनीही प्रचार करणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – प्रियंका गांधींची राजकारणात एन्ट्री; काँग्रेस सरचिटणीस पदी नियुक्ती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -