घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटइबोलाचं 'हे' औषध कोरोनावर गुणकारी; उपचारासाठी शोधला नवा मार्ग

इबोलाचं ‘हे’ औषध कोरोनावर गुणकारी; उपचारासाठी शोधला नवा मार्ग

Subscribe

आतापर्यंत रेमेडिसिव्हिर औषध कोरोना विषाणूच्या उपचारात सर्वात प्रभावी मानलं जातं. रुग्णांवर त्याचा परिणाम दिसून आल्यानंतर औषध बनवणारी कंपनी गिलियड हे औषध अधिक सहजतेने कसं घेता येईल यावर विचार करीत आहे. कंपनीने एक निवेदन जारी केलं आहे. रेमेडिसिव्हिर वापरण्याच्या इतर मार्गांचा शोध घेत आहोत, तसंच यासाठी इनहेलरवर संशोधन केलं जात आहे, असं कंपनीने निवेदनात म्हटलं आहे.

वॉल स्ट्रीट या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कंपनीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी मरदाद पारसी यांनी कंपनीच्या योजनांबद्दल सांगितलं. ते म्हणाले की, आगामी काळात रेमेडिसिव्हिरच्या इंजेक्शनसह पावडर बनवण्याचं संशोधन सुरु आहे, ज्यामुळे ते औषध इनहेलरद्वारे घेता येईल. रेमेडिसिव्हिर गोळीच्या स्वरूपात दिलं जाऊ शकत नाही कारण त्याचे रासायनिक थर यकृताला हानी पोहचवतात. हे औषध फक्त इंट्राव्हेनस (आयव्ही) स्वरूपात रूग्णालयात दिलं जाऊ शकतं. गिलियड रेमेडिसिव्हिरच्या विद्यमान आयव्ही फॉर्म्युलेशनला कसं पातळ केलं जाऊ शकतं आणि नेब्युलायझरद्वारे कसं घेतलं जाऊ शकतं याचा अभ्यास करीत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोनाचा खुलासा करणाऱ्या सहाव्या डॉक्टरचा मृत्यू, त्वचा पडली होती काळी


अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी जेफरीजचे विश्लेषक मायकेल यी म्हणाले, “लोकांना आशा आहे की औषध इनहेलर पद्धतीत लवकरच येईल.” तथापि, अद्याप त्याचा शोध सुरूवातीच्या टप्प्यात आहे. ते म्हणाले की इनहेलरची मागणी मर्यादित असू शकते कारण विषाणूचा संसर्ग असलेल्या अनेक लोकांना फारच कमी उपचारांची आवश्यकता असते. मायकेल म्हणाले की गिलियड रेमेडिसिव्हिर हे औषध पुरवण्याची क्षमता वाढवत आहे आणि जगभरातील सरकारांशी त्याच्या व्यावसायिक दराविषयी चर्चा सुरू आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -