घरदेश-विदेशझोपेचे औषध देऊन चिमुरडयांवर केला जात होता 'बलात्कार'

झोपेचे औषध देऊन चिमुरडयांवर केला जात होता ‘बलात्कार’

Subscribe

शेल्टर होम शेजारी वसाहत आहे. या मुलींचा ओरडण्याचा, मदत मागण्याचा, रडण्याचा आवाज शेजारी राहणाऱ्यांना का आला नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या संदर्भात शेजारच्यांशी विचारणा केल्यावर काहींनी आवाज ऐकून दुर्लक्ष केले

बिहारमधल्या मुझ्झफरपुरनगरमध्ये शेल्टर होममध्ये मुलींवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली होती. या शेल्टर होममध्ये असणाऱ्या मुलींवर रोज बलात्कार होत असल्याचे समोर आले होते. आणि आता यातील एका पीडित मुलीने अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा केला आहे. या चिमुरड्या मुलींना रोज झोपेचे औषध दिले जायचे आणि त्यांच्यावर बलात्कार केला जायचा, असे या पीडित मुलीने सांगितले असून वेदनेने विव्हळत असलेल्या या मुलींची हाक शेल्टर होमच्या परीसरातील लोकांना का ऐकू आली नाही? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. आतापर्यंत ३४ जणांवर या शेल्टर होममध्ये बलात्कार झाल्याचे सिद्ध झाले असून या शेल्टर होमचा नराधम चालक ब्रिजेश कुमार आणि त्याचे कर्मचारी सध्या अटकेत आहे.

वाचा- बलात्कार करुन मुलीला गाडले, शेल्टर होममधील धक्कादायक प्रकार

किड्यांचे औषध पाजायचे

बलात्काराचे हे प्रकरण समोर आल्यानंतर या मुलींनी त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराची माहिती पोलिसांना दिली आहे. या शेल्टर होममध्ये ७ ते १८ वयोगटातील अनाथ आणि हरवलेल्या मुली होत्या. या शेल्टर होममधील महिला कर्मचारीच या मुलींना किड्यांचे औषध सांगून रोज रात्री काहीतरी द्यायच्या त्याने झोप यायची आणि मग सकाळी सबंध अंग दुखायचे अशी माहिती एका पीडित मुलीने दिली. ती पुढे म्हणाली, की है औषध पाजल्यानंतप शेल्टर होम चालवणारा ब्रिजेश कुमारच्या खोलीत नग्न झोपायला लावले जायचे. सकाळी पोटात लाथ मारुन उठवले जायचे तेव्हा, शरीरावर कपडे नसायते, अंगदुखी आणि थकवा जाणवायचा. या रोजच्या अत्याचारामुळे अनेक मुलींच्या मनावर खोलवर परिणाम झाला असून त्यांनी बोलणेच सोडून दिले आहे. ही माहिती एका १० वर्षीय पीडित मुलीने पॉक्सो कोर्टाला दिली आहे.

- Advertisement -

विरोध केल्यास गरम तेलाचे चटके

जेवणातून काहीतरी औषध दिले जायचे, हे अनेक मुलींना कळत होते. त्यानंतर आपल्यासोबकत काहीतरी विपरीत होत असल्याचे देखील कळत होते. म्हणून या शेल्टर होममधील मुली रात्री काही खाणे टाळत होत्या. पण तरीदेखील त्यांच्यावर जबरदस्ती व्हायची. नकार दिल्यास गरम तेल किंवा पाणी ओतले जायचे अशी माहिती देखील अन्य मुलींनी दिली आहे.

वाचा-बलात्कार करुन गाडलेल्या मुलीचा शोध थांबला

मदतनीस मुलीवरही अत्याचार

शेल्टर होममध्ये असलेल्या मदतनीस मुलीवरही अन्याय होत असल्याचे मुलींनी सांगितले आहे. ‘ मोठ्ठ पोट असलेला माणूस (ब्रिजेश कुमार)औषध खायला द्यायचा विरोध केल्यावर मारायचा. त्याच्या ऑफिसमध्ये नेऊन गुप्तांग ओरबाडून त्यावर जखमा करायचा’, असे पीडित मुलींनी सांगितले. शिवाय त्या ठिकाणी कोणीतरी बाहेरुन यायचे असा खुलासा देखील या मुलींनी केला आहे.

- Advertisement -

कोणालाही आवाज आला नाही?

शेल्टर होम शेजारी वसाहत आहे. या मुलींचा ओरडण्याचा, मदत मागण्याचा, रडण्याचा आवाज शेजारी राहणाऱ्यांना का आला नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या संदर्भात शेजारच्यांशी विचारणा केल्यावर काहींनी आवाज ऐकून दुर्लक्ष केले तर काहींना मुली कधी शेल्टर होमच्या आवारात दिसल्या नाहीत, अशी काहीशी उत्तरे मिळाली. शेजारी राहणाऱ्यांनी शंका उपस्थित केली असती तर हा प्रकार वेळीच थांबवता आला असता अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -