घरदेश-विदेशगर्लफ्रेंडने 'नोकरी' निवडल्याने बॉयफ्रेंडचा आत्महत्येचा प्रयत्न

गर्लफ्रेंडने ‘नोकरी’ निवडल्याने बॉयफ्रेंडचा आत्महत्येचा प्रयत्न

Subscribe

गाजियाबाद पोलिसांनी वडिलांकडे चौकशी केल्यानंतर वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार रवीच्या वडिलांनी त्याच्या गर्लफ्रेंडने नोकरी करणे त्याला पसंत नव्हते. त्यामुळेच त्याने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला

गर्लफ्रेंडने नोकरी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे एका तरुणाने स्वत:चाच गळा चिरल्याची घटना गाझियाबादमध्ये बुधवारी घडली आहे.रवी यादव असे या तरुणाचे नाव असून सुदैवाने या तरुणाला योग्यवेळी हॉस्पिटलमध्ये नेल्यामुळे त्याचे प्राण वाचले आहेत. पण अत्यंत क्षुल्लक कारणामुळे रवीने हे पाऊल उचलल्याचे गाझियाबाद पोलिसांनी सांगितले आहे. या संदर्भात कोणताही गुन्हा अद्याप नोंदवण्यात आलेला नाही.

वाचा- दारूसाठी पैसे हवेत म्हणून केला तरुणाचा खून

नेमकं प्रकरण काय?

गाझियाबादमधील खोडा परीरातील अनिल विहार परीसरात रवी यादव (२२) आपल्या कुटुंबासोबत राहतो. नोएडामध्ये तो फूड डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतो. मंगळवारी तो त्याच्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी गेला. काहीच दिवसांपूर्वी ती नोकरी करु लागली होती. तिने नोकरी करणे त्याला पसंत नव्हते. त्यामुळे त्यांच्यात भांडणे देखील झालीत. पण ती दोघे घरी निघून आली. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता त्याने त्याच्या वडिलांना झोपेतून उठवले आणि मी कायमचा जातो असे सांगितले. वडिलांनी कुठे जातो? असे विचारले आणि तो खाली कोसळला. वडिलांना त्याच्या गळ्यातून रक्त येताना दिसले. त्यांनी तातडीने त्याला हॉस्पिटलमध्ये नेले आणि त्याचे प्राण वाचले.

- Advertisement -
धक्कादायक!  खून लपवण्यासाठी पतीचा मृतदेह अंगणात जाळला

गर्लफ्रेंडने नोकरी करणे नव्हते पसंत

गाजियाबाद पोलिसांनी वडिलांकडे चौकशी केल्यानंतर वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार रवीच्या वडिलांनी त्याच्या गर्लफ्रेंडने नोकरी करणे त्याला पसंत नव्हते. त्यामुळेच त्याने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला . त्याने गळा चिरुन घेतलेले कळताच ती आली आणि आम्ही रवीला हॉस्पिटलला आणले, असे सांगितले. पोलिसांनी अद्याप या संदर्भात कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -