मरता मरता प्रेयसीने घेतला प्रियकराचा बदला

प्रियकराने प्रेयसीला पेटवताच प्रेयसीने त्याला मिठी मारली.

मरता मरता प्रियसीने घेतला प्रियकराचा बदला

प्रेम संबंधात नकार मिळाल्यावर अनेक विचित्र प्रकार नेहमीच घडत असतात.असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रेमसंबंधात नकार मिळाल्याने प्रियकराने आपल्या प्रियसीला जाळले. जळणाऱ्या प्रेयसीने प्रियकाराला मिठी मारली यात दोघेही जळून खाक झाले. ही घटना आंध्रप्रदेशच्या विजयवाडा येथील हनुमानपेट येथे घडली. या घटनेमुळे दोघांच्याही कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

मृत महिलेचे २४ वर्ष होते. विजयवाडा येथील कोविड शुश्रृषा रूग्णालयात ती काम करत होती. दोन वर्षापूर्वी या महिलेचे एका एका युवकासोबत प्रेमसंबंध जुळले होते. त्यांचे एकमेकांवर जिवापाड प्रेम होत. त्यांच्या नात्याबद्दल त्यांनी घरच्यानाही सांगितले होते. मात्र मुलीच्या घरच्यांना त्यांच नातं मान्य नव्हतं. घरच्यांनी नकार दिल्याने मुलीने प्रियकरापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रियकराला हे मान्य नव्हतं. प्रेयसीने अनेकदा समजावूनही प्रियकर ऐकायला तयार नव्हता. अनेकदा तो तिचा पाठलाग करत असे. प्रियकाराच्या त्रासाला कंटाळून प्रेयसीने प्रियकराविरूद्ध पोलिसात तक्रारही दाखल केली होती. मात्र प्रियकराच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही.

प्रेयसी कामावरून घरी जाताना प्रियकराने तिला रस्त्यात अडवले. दोघांमध्ये टोकाची भांडणे झाली. दोघांच्या रागाचा पारा चढला होता. तेवढ्यातच प्रियकाराने रॉकेलचा कॅन प्रेयसीच्या अंगावर ओतून भररस्त्यात तिला जाळले. आगीने पेट घेताच आपण आता यातून सुटणार नाही हे प्रेयसीच्या लक्षात आले. अंगावर लागलेल्या भडकत्या आगीतच प्रेयसीने प्रियकराच्या दिशेने धाव घेतली. समोर उभा असलेल्या प्रियकराला तिने घट्ट मिठी मारली. प्रियकराने मिठीतून बाहेर येण्याचा प्रयत्न केला परंतु तोवर दोघेही प्रचंड भाजले झाले होते. त्या आगीत जळून प्रेयसी सोबत प्रियकराचाही मृत्यू झाला.


हेहि वाचा – लॉकडाउनमध्ये आजोबांचा घराबाहेर पडण्याचा हट्ट, नातवाने कंटाळून आजोबांचे हात पाय बांधले अन् तोंडाला चिकटपट्टी लावून नाल्यात फेकले