प्रियकराने दिला प्रेमात धोका; प्रेयसीने घेतला भन्नाट बदला!, तुम्हालाही हसू आवरणार नाही!

प्रेयसीने आपल्या प्रेमाचा सूड घेण्यासाठी बघा काय केले....

China

चीनमध्ये एका तरूणीचे प्रेम प्रकरणात हृदय तुटल्याने तिने प्रियकराचा बदला घेण्याचे ठरवले. प्रेयसीने आपल्या प्रेमाचा सूड घेण्यासाठी प्रियकराचा दारात चक्क एक टन कांदे नेऊन टाकले, आणि त्याला ओरडून सांगितले आता जेवढे रडायचे तेवढे रड… हे ऐकून विनोदी वाटेल पण असा प्रकार चीनमध्ये घडला असल्याचे सांगितले जात आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, या तरूणीची ओळख तिच्या झाओ या नावातून झाली. त्यानंतर काही दिवसांनी प्रियकराने फसवून तिला सोडून दिले. हे दोघे एका वर्षापेक्षा अधिक काळ प्रेमसंबंधात एकत्र होते परंतु तिच्या प्रियकराने तिच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

रागात झाओने त्याच्या घरी एक हजार किलो कांदे पाठवण्याचा निर्णय घेतला. तिने ही कांद्याची डिलिव्हरी करणाऱ्याला सांगितले की, कोणतीही विचारपूस न करता त्याच्या पत्त्यावर हे कांदे पाठवायचे. चिनच्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात या प्रकाराचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात असे दिसतंय की कांद्याच्या भरपूर गोण्या त्या प्रियकराच्या दारात पडल्या आहेत.

Ladbible ने दिलेल्या माहितीनुसार, कांद्याबरोबरच झाओने एक चिठ्ठीदेखील पाठविली आहे. ज्यामध्ये “मी तीन दिवस रडली, आता तुझी वेळ आली आहे,”, असे लिहिले होते. झाओचा प्रियकर हे पाहून आश्चर्यचकित झाला. मात्र नंतर त्याने त्याच्या मित्र परिवाराला सांगितले की प्रेयसीच्या वाढत्या नाटकांमुळे मी तिच्याशी ब्रेकअप केला आहे.

तो म्हणाला, ‘माझी प्रेयसी खूपच नौटंकी होती. ती सर्वांना सांगत आहे की माझ्या ब्रेक-अपनंतर एकदाही रडलो नाही. मी रडत नाही म्हणून मी एक वाईट व्यक्ती आहे? ‘ या घटनेनंतरही तिचा प्रियकर कदाचित रडला नसेलही. मात्र घराच्या आजू-बाजूला असलेल्या या कांद्याच्या ढिगांमुळे शेजारी अश्रू ढाळून बेजार झाले आहे.


Video: जगातील शेवटच्या तस्मानियन वाघाचा एक दुर्मिळ व्हिडिओ व्हायरल!