हिंसेची वाट सोडा…हत्यारे खाली ठेवा आणि चर्चा करा

हिंसेची वाट धरलेल्या तरुणांनी हत्यारे खाली ठेवा आणि चर्चा करा, असे आवाहन जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी हिंसेची वाट धरलेल्या राज्यातील तरुणांना केले आहे.

Jammu kashmir
Satya Pal Malik
सत्यपाल मलिक, जम्मू काश्मीरचे राज्यपाल

हत्यार सोडा आणि चर्चेला या‘, असे आवाहन जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी हिंसेची वाट धरलेल्या राज्यातील तरुणांना केले आहे. तसेच हातात घेतलेली शस्त्रे खाली ठेवून राजभवनात भोजनाला या आणि तुम्ही निवड केलेल्या मार्गामुळे काश्मीरला काय मिळणार, ते मला सांगा, असे मलिक यांनी तरुणांना विचारणा केली आहे.

काय म्हणाले सत्यपाल मलिक?

हिंसेची वाट धरलेल्या तरुणांनी हत्यारे खाली ठेवा आणि चर्चा करा. चर्चेतून प्रश्न सुटतात. तुम्हाला ज्या काही समस्या आणि काही प्रश्न असल्यास ते प्रश्न संविधानाच्या चौकटीत बसणाऱ्या त्यांच्या मागण्या चर्चेतून पूर्ण होऊ शकतील, असे आवाहन मलिक यांनी केले आहे. तसेच हातात शस्त्रे उचललेल्या तरुणांना त्यांनी निवडलेल्या मार्गाची कल्पना नाही. त्याचप्रमाणे दहा वर्षांनी त्यांना याची जाणीव होईल आणि त्यावेळी त्यांच्या मनात पश्चातापाची भावना असेल. तसेच हिंसेच्या माध्यमातून देशाला झुकवले जाऊ शकत नाही, असेही ते पुढे म्हणाले. दरम्यान, राज्याच्या प्रशासनाच्या कामगिरीची माहिती पत्रकारांना देताना त्यांनी हे आवाहन केले आहे.


हेही वाचा – जम्मू-काश्मीरमध्ये CRPF जवानांवर पुन्हा दहशतवादी हल्ला; ५ जवान शहीद


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here