घरदेश-विदेशचाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी जगभरातून ३३७ जणांना अटक

चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी जगभरातून ३३७ जणांना अटक

Subscribe

डार्क वेब मार्फत चाईल्ड पोर्नोग्राफी करणाऱ्या ३३७ जणांना विविध देशातून अटक करण्यात आली आहे. अल्पयीन मुलांच्या संरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार या ३३८ जणांना अटक करण्यात आली आहे. ‘डार्क वेब’च्या विरोधात करण्यात आलेल्या या कारवाईत इंटरनॅशनल लॉ इनफोर्समेंट अथोरिटीला मोठे यश आल्याचे बोलले जात आहे. इंटरनेटवर डार्क वेब या वेबसाईटवर चाईल्ड पॉर्नोग्राफीचे व्हिडिओ आरोपी बिटकॉइनच्या रुपात विकत असे. विशेष म्हणजे या सर्व गैरव्यव्हारात व्हिडिओ कोण युजर्सची माहिती कुणालाही ठाऊक पडत नसे, यासाठी विशेष पैसे आकारला जात असे. युजर्स बद्दल माहिती गुपीत ठेवल्यामुळे लाखो लोक या वेबसाईटवर येत असे. ते बिटकॉइनच्या मार्फत पैसे देत आणि हवा असलेला व्हिडिओ डाऊनलोड करत असे. मात्र, या वेबसाईटवर चाईल्ड पोर्नोग्राफी, ड्रग्जची तस्करी हे गैरप्रकार मोठ्या प्रमाणात घडत.

२३ अल्पवयीन मुलांची सुटका

अमेरिका, ब्रिटन, दक्षिण कोरिया आणि इतर देशाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या कारवाईत २३ अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली आहे. या अल्पवयीन मुलांची चौकशी केली असता त्यांच्याकडून जबरदस्तीने व्हिडिओ काढले जात असल्याची माहिती समोर आली आहे. चाईल्ड पोर्नोग्राफीची डार्क नेटवर ‘वेलकम टू व्हिडिओ’ असा विभाग होता. आता जागतिक सुरक्षा यंत्रणांनी इंटरनेटवरील हा विभाग सील केला आहे. त्यामुळे कुणालाही हे व्हिडिओ आता दिसणार नाहीत. चाईल्ड पोर्नोग्राफीच्या व्हिडिओमुळे जगभरातील गुन्हेगारांची संख्या वाढली होती. त्यामुळे यावर मार्ग काढणे अतिशय जरुरीचे होते.

- Advertisement -

२ लाख ५० हजार चाइल्ड पोर्नोग्राफाचे व्हिडिओ अपलोड

‘वेब डार्क’वर ‘वेलकम टू व्हिडिओ’ हा विभाग २०१५ साली सुरु करण्यात आला होता. यामार्फत आरोपींनी मार्च २०१८ पर्यंत ४२० बिटकॉइन्स म्हणजे ३ लाख ७० हजार डॉलर पैशे कमवले. तीन वर्षांत ७,३०० वेळा ट्रान्झिक्शन झाल्याचे उघड झाले. वेलकम टू व्हिडिओमध्ये तीन वर्षात २ लाख ५० हजार चाइल्ड पोर्नोग्राफाचे व्हिडिओ अपलोड करण्यात आले होते. याप्रकरणी ५ मार्च २०१८ रोजी सन जाँग वू या २३ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आले होते. तेव्हापासून तपास सुरु होता. अखेर याप्रकरणी ३३८ जणांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -