घरदेश-विदेशसिमेंटचे ब्लॉक तयार करणाऱ्या कंपनीत स्फोट; ९ जण जखमी

सिमेंटचे ब्लॉक तयार करणाऱ्या कंपनीत स्फोट; ९ जण जखमी

Subscribe

स्फोटात जखमी झालेल्या सर्व कामगारांना ताबडतोब नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामधील ३ जणांची प्रकृती गंभीर आहे.

गोव्यामध्ये एका कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. गोव्याच्या ट्वेम इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये सिमेंटच्या ब्लॉक तयार करणाऱ्या कंपनीत दुपारी अचाकन स्फोट झाला. या स्फोटामध्ये ९ कामगार जखमी झाले असून त्यामधील ३ जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार स्फोटानंतर फायर ब्रिगेडची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. हा स्फोट ऐवढा भीषण होता की या स्फोटामुळे कंपनीच्या भिंतींना तडे गेले आहेत.

- Advertisement -

सिमेंटच्या ब्लॉक बनवण्याच्या कंपनीमध्ये दुपारी अचानक स्फोट झाला. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी कंपनीमध्ये कामगार उपस्थित होते. या स्फोटामध्ये ९ कामगार जखमी झाले तर तीन गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दलाने धाव घेतली. जखमी झालेल्या सर्व कामगारांना ताबडतोब नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामधील ३ जणांची प्रकृती गंभीर आहे. या स्फोटामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे तर कंपनीच्या बाहेर उभ्या असलेल्या गाड्यांचे देखील नुकसान झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -