गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचे निधन

गेल्या काही दिवसांपासून दिर्घ आजाराने ग्रस्त असलेले मनोहर पर्रिकर यांचे निधन झाले आहे.

Goa
manohar parrikar died
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाले आहे. गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा निरोप घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून पर्रिकर यांच्यावर उपचार सुरु होते. स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे ते त्रस्त होते. त्यांच्यावर गोवा, मुंबई, अमेरिका, दिल्ली त्यानंतर पुन्हा गोव्यात उपचार सुरु होते. गेल्या दोन दिवसापासून त्यांची प्रकृती सतत बिघड चालली होती. त्याच्यवार त्यांच्या निवास्थानीच उपचार सुरु होते. अखेर उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. पर्रिकरांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गोवाचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर उद्या सकाळी ११ वाजता केंद्रीय मंत्रिमंडळात शोकसभा होणार आहे.

शनिवारपासून मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. त्याची प्रकृती अधिकच खालवल्यामुळे त्यांच्यावर त्यांच्या निवासस्थानी उपचार सुरु होते. दरम्यान, काही वेळापूर्वी गोवा मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांची प्रकृती अधिकच खालवल्याची माहिती दिली होती. ट्विटरवरुन त्यांनी ही माहिती दिली होती. अखेर उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले आहे. दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करुन पर्रिकरांना श्रध्दांजली वाहिली आहे.

फेब्रुवारी २०१८ मध्ये पर्रिकरांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्यानंतर त्यांच्यावर आधी मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर ते उपचारासाठी अमेरिकेला गेले. त्याठिकाणावरुन आल्यानंतर त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात ही उपचार करण्यात आले होते. गेल्या काही महिन्यापासून त्यांच्यावर गोव्यातच उपचार सुरु होते. शनिवार सकाळपासून त्यांची प्रकृती बिघडत चालली होती. त्यांच्यावर उपचार सुरुच होते दरम्यान त्यांचे निधन झाले

आयआयटी मुंबईमधील शिक्षण घेतलेले पर्रिकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय प्रचारक होते. ते तीन वेळा गोव्याचे मुख्यमंत्री झाले होते. त्याचसोबत ते केंद्रीय संरक्षण मंत्री देखील होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here