गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी पदभार स्विकारला

प्रमोद सावंत यांची गोव्याच्या नव्या मुख्यमंत्री पदी निवड झाली आहे. रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

Goa
Goa Chief Minister Pramod Sawant:
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री झालेले प्रमोद सावंत यांनी पदभार स्विकारला. बुधवारी म्हणजे उद्या विधानसभेमध्ये फ्लोर टेस्ट देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर ७ दिवसाचा राजकीय दुखवटा पाळण्यात आला आहे. पदाचा कार्यभार स्विकरल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी असे सांगितले की, ‘पुढच्या सात दिवस कोणीही मी मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा देऊ नये तसंच जल्लोष साजरा करु नका’

मी मनोहर पर्रिकरांमुळेच इथे आहे

नवनिर्वाचित मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज गोव्याच्या मुख्यालयात पोहचून त्यांनी पदभार स्विकारला. त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्ची शेजारी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा फोटो लावला आहे. माध्यामांशी बोलल्यानंतर त्यांनी पर्रिकरांच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन केले. प्रमोद सावंत यांचे मनोहर पर्रिकर यांच्यासोबत जवळचे संबंध होते. तसंच मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याआधी त्यांनी ‘मी आज जो काही आहे ते मनोहर पर्रिकरांमुळेचं’ असल्याचे त्यांनी सांगितले. तसंच त्यांच्यामुळेच मी राजकारणात आलो आणि त्याच्यामुळेच मी गोवा विधानसभेचा स्पीकर बनलो असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

रात्री पावणे दोन वाजता घेतली शपथ

गोव्याच्या मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला. प्रमोद सावंत यांची गोव्याच्या नव्या मुख्यमंत्री पदी निवड झाली आहे. रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी प्रमोद सावंत यांना शपथ दिली. तर प्रमोद सावंत यांच्यासोबत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांची उपमुख्यमंत्री पदी निवड झाली असून त्यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसंच मनोहर आजगावकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे, विनोद पालयेकर, जयेश साळगांवकर, मावन गुदिन्हो, विश्वजित राणे, मिलिंद नाईक, निलेश काब्राल, गोविंद गावडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.