घरदेश-विदेशमनोहर पर्रीकर घरी, काँग्रेस उतरली रस्त्यावरी!

मनोहर पर्रीकर घरी, काँग्रेस उतरली रस्त्यावरी!

Subscribe

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज्याच्या कामकाजाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत गोवा काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

गोव्यामध्ये गेल्या ९ महिन्यांपासून सातत्याने राजकीय घडामोडी घडत आहेत. आणि याला कारणीभूत आहे मनोहर पर्रीकर यांचं बिघडलेली प्रकृती. गोव्याचे मुख्यमंत्री या नात्याने मनोहर पर्रीकर यांच्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या असून देखील त्यांच्या आजारपणामुळे त्यांना कामासाठी पुरेसा वेळ देता येत नाहीये. आणि हाच मुद्दा उचलून धरत आता गोवा काँग्रेसने रान पेटवायला सुरुवात केली आहे. अगदी महिन्याभरापूर्वी पर्रीकरांच्या आजारपणामुळे राज्याकडे दुर्लक्ष होत असल्याची अप्रत्यक्ष टीका करत असलेल्या काँग्रेसने आता थेट पर्रीकरांच्या राजीनाम्याचीच मागणी करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघायला सुरुवात झाली आहे.

काँग्रेस नेत्यांचं एक दिवसीय उपोषण

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपद सोडावे यासाठी आता गोवा काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. तालुका स्तरावर हे आंदोलन केले जाणार असून त्याची सांगता लोहिया मैदानावर जाहीर सभेच्या माध्यमातून केली जाणार आहे. मंगळवारी गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करून मुख्यमंत्र्यांनी पायउतार होण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी गोवा सरकार असंवेदनशी झाले असल्याची टीका केली.

- Advertisement -

‘सह्या मुख्यमंत्री करतात की दुसरं कुणी?’

‘गेल्या ९ महिन्यांपासून गोवा प्रशासन ठप्प झालं असून कोणत्याही प्रकारची सरकारी कामं पुढे सरकत नाहीत. लोकांचे प्रश्न प्रलंबित राहात असून भ्रष्टाचारात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. इतकंच काय, महत्त्वाच्या फायलींवर मुख्यमंत्री स्वत: सह्या करतात की दुसरं कोणी, याबाबत देखील संशयच आहे’, अशा शब्दांमध्ये चोडणकर यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि गोवा भाजप सरकारवर टीका केली आहे. यासोबतच गोवा काँग्रेसने न्यायालयीन लढा देखील सुरू केला असून ट्रोजन डिमेलो यांनी दाखल केलेल्या याचिकेतून न्यायालयात ही बाब मांडली जात आहे. येत्या ३० तारखेला जोरदार आंदोलन छेडणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.


तुम्ही हे वाचलंत का? – मनोहर पर्रीकरांना द्यायचाय मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा?

९ महिन्यांपासून पर्रीकर आजारी

गेल्या ९ महिन्यांपासून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर स्वादुपिंडाच्या आजाराचे उपचार सुरू आहेत. त्यांना कर्करोग झाला असण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर पर्रीकरांनी दिल्लीतील एम्स, गोव्यातील सरकारी रुग्णालय ते थेट अमेरिकेतील कर्करोगाशी संबंधित मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात देखील उपचार घेतले आहेत. सध्या पर्रीकर त्यांच्या राहत्या घरी उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -