घरदेश-विदेशआता गोव्यात चालणार ‘Goa Miles’

आता गोव्यात चालणार ‘Goa Miles’

Subscribe

मुजोर टॅक्सी चालकांना आळा घालण्यासाठी आणि अव्वाच्या सव्वा भाडे आकारणाऱ्या टॅक्सी चालकांवर अंकूश बसवण्यासाठी गोवा राज्य शासनाने नवे अॅप सुरु केले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी या अॅपला हिरवा कंदील दाखवला आहे. गोवा टूरिजम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (GTDC) ने हे अॅप डेव्हलप केले. या अॅपचा फायदा स्थानीक प्रवाशांसह पर्यंटकांनाही होणार आहे. पर्यटकांना टॅक्सीबाबत समस्या होऊ नये म्हणून अॅप बनवण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला होता. असे अॅप बनवणारे गोवा राज्य हे देशात प्रथमच ठरले आहे.

अॅपचा होणार पर्यटकांना फायदा

गोव्यात येणाऱ्या पर्यंटकांना टॅक्सीची मोठ्या प्रमाणावर गरज पडते. खाजगी टॅक्सी घेतल्यामुळे अनेकदा पर्यटकांना टॅक्सी चालक ओव्हरचार्ज करतात. ही सेवा सुरु झाल्यामुळे आता पर्यटकांना फायदा होणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितल की, “टॅक्सी व्यवसायीक आपल्या क्षमतेने काम करत नाहीत. राज्यात टॅक्सींची मागणी दोन ते तीन पट वाढली आहे. टॅक्सी उपलब्ध असल्यास प्रवाशी आपले खाजगी वाहनांचा उपयोग करणे कमी होईल त्यामुळे इंधनाची बचत होण्यास मदत होईल.”

- Advertisement -

“गुगल प्ले स्टोर वर” उपलब्ध

हे अॅप अँड्राइड युजर्सना ‘गुगल प्ले स्टोर’वरुन डाऊनलोड करता येणार आहे. प्ले स्टोरवर जाऊन त्यांना Goa Miles टाईप करुन हे अॅप डाऊलोड करता येईल.

एका तासात १२० बुकिंग

या अॅपचे लॉन्च केल्यानंतर एका तासात युजर्स कडून १२० टॅक्सी बुक करण्यात आल्या. सध्या गोवा पर्यटन विभागाकडे ३५० गाड्यांनी नोंदणी केली आहे. प्ले स्टोरवरून ६ हजार युजर्सने हे अॅप डाऊनलोड केले आहे.

- Advertisement -

पर्यटकांना मिळाणार सुरक्षा

गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर अजगांवकर यांनी दिलेल्या माहिती नुसार हे अॅप शासनाच्या अखत्यारीत असल्याने प्रवाशाच्या सुरक्षेचा ही पूर्ण विचार केला गेला आहे. पर्यटकांना रस्त्यांची माहिती बरोबर सुरक्षेचेही ऑप्शन दिले जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -