घरदेश-विदेश'गोव्याला नवा मुख्यमंत्री हवा'

‘गोव्याला नवा मुख्यमंत्री हवा’

Subscribe

गोव्यात आज ना उद्या नेतृत्व बदल करावा लागणार अशा शब्दात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी नेतृत्व बदलाची शक्यता वर्तवली आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर सध्या आजारपणामुळे घरीच आहेत. त्यांच्या जागी आता नवा मुख्यमंत्री नेमा अशी मागणी होत आहे. पण, गोवा भाजपकडून मात्र पर्रिकर लवकर बरे होऊन परत येतील असं सांगितले जात आहे. पण, काँग्रेसनं मात्र भाजपला घेरण्याचा पुरेपुर प्रयत्न केला आहे. या साऱ्या घडामोडी घडत असताना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी आता गोव्यात नेतृत्व बदल व्हायला हवा. मनोहर पर्रिकर यांची प्रकृती ठिक नसल्यानं त्यांच्या जागी नवा मुख्यमंत्री नेमावा अशी मागणी केली आहे. योगा डे निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये श्रीपाद नाईक बोलत होते. मागील अनेक महिन्यांपासून मनोहर पर्रिकर यांच्यावर उपचार सुरू आहेत. आम्हाला आज किंवा उद्या नेतृत्व बदल हा करावाच लागणार आहे. तुम्हाला ठावूक आहे की, मनोहर पर्रिकर यांची तब्येत ठीक नाही. पण, त्या परिस्थितीमध्ये देखील ते सध्या काम करत आहेत. अशा शब्दात श्रीपाद नाईक यांनी येत्या काही काळात गोव्यात नेतृत्व बदल होऊ शकतो याचे संकेत दिले.

वाचा – ‘भाजप सत्तेसाठी मनोहर पर्रिकरांच्या जिवाशी खेळतंय’

मनोहर पर्रिकर सध्या घरीच

कॅन्सरनं आजारी असलेल्या मनोहर पर्रिकर यांच्यावर सध्या गोव्यातील घरी उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मनोहर पर्रिकर घरूनच सांभाळत आहेत. यापूर्वी मनोहर पर्रिकर यांना उपचारासाठी अमेरिकेला देखील हलवण्यात आलं होत. पण, अमेरिकेहून परतल्यानंतर काही दिवसांतच त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना मुंबई आणि त्यानंतर दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आलं. पण, त्यानंतर मात्र एम्सच्या डॉक्टरांनी पर्रिकर यांच्यावर घरीच उपचार करा असा सल्ला दिल्यानं पर्रिकरांवर सध्या गोव्यातील घरी उपचार सुरू आहेत. पण, आता श्रीपाद नाईक यांनी नेतृत्व बदलाची भाषा केल्यानं गोव्यात पर्रिकरांच्या जागी कोण? याची चर्चा सुरू झाली आहे.

वाचा – मनोहर पर्रिकरांची प्रकृती स्थिर; गोव्यात नेतृत्व बदल नाहीच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -