‘बकरी’मुळे फार्म मालकावर ‘संक्रात’; ‘तिला’ कापून ‘गटारी’ साजरी

बकरीनं पैसे खाल्ले आणि शेतकऱ्याचं स्वप्न भंगलं. त्यानंतर त्यानं बकरीचा बळी दिला.

Serbia
goat meat

क्षेत्र कोणतंही असो, प्रत्येकाचं त्या क्षेत्रात काहीतरी नवीन करायचं, त्या क्षेत्रातील सर्वोच्च पदावर पोहोचायचं हा उद्देश असतो. त्यासाठीचा प्रवास देखील तितकाच खडतर असतो. अशा वेळी जर अपेक्षा भंग झाला तर मात्र अनेक वेळा आपण टोकाचं पाऊल उचलतो. सर्बियामध्ये असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. एका शेळी फार्म चालवणाऱ्या मालकानं पै-पै जमवून पेैसे गोळा केले. त्यापैशातून त्याला फार्मसाठी जागा विकत घ्यायची होती. सध्याचा फार्म वाढवायचा होता. त्यासाठी पैसे जमल्यानंतर सदर मालकानं व्यवहाराची बोलणी देखील केली. सर्व व्यवहार बोलणी – चालणी झाली देखील. पण, चक्क बकरीनं पैसे खाल्ले आणि स्वप्नांवर पाणी ओतण्याची वेळ मालकावर आली. त्यानंतर त्यानं स्थानिक पत्रकाराला बोलवून बकरीचा बळी दिला आणि त्याला चक्क रात्रीच्या जेवणाला बोलावले.

काय आहे प्रकरण

सर्बियातील अरॅनजेलोवेक या गावातील एका शेतकऱ्याचं १० एकरावर शेळीचं फार्म आहे. अनेक वर्ष कष्ट करून उभं केलेलं हे फार्म वाढवण्याचा निर्णय या शेतकऱ्यानं घेतला. त्यासाठी सर्व तयारी झाली. पैसे देखील गोळा झाले. सर्व एकदम मस्त चाललं होतं. व्यवहार होणाऱ्या सकाळी शेतकरी उठला आणि आपलं नेहमीचं काम करायला म्हणून फार्मवर गेला. पण, यावेळी तो खोलीचा दरवाजा बंद करायला विसरला. दरम्यानच्या काळात फार्ममधील एका शेळीनं नजर चुकीनं पैसे ठेवलेल्या खोलीत प्रवेश केला. त्यानंतर तिनं जवळजवळ सारे पैसे फस्त केले. व्यवहार करते वेळी ही बाब शेतकऱ्याच्या लक्षात आल्यानं त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. कारण केवळ एका बकरीमुळे क्षणात स्वप्न भंगलं होतं. या संतापाच्या भरात शेतकऱ्यानं बकरीला कापण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यानं स्थानिक पत्रकाराला आमंत्रण देऊन जेवण देत आपला संताप व्यक्त केला.

 

Arandjelovac

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here