‘नोटवर लक्ष्मीचा फोटो छापल्यास रुपयाचे मूल्य वाढेल’

रुपयाचे मूल्य वाढवण्यासाठी नोटावर लक्ष्मीचा फोटो छापावा, असा अजब दावा भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींनी केला आहे.

Mumbai
subramanian swamy
भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरु आहे. त्यामुळे जर रुपयाचे मूल्य वाढवायचे असल्यास भारताच्या चलनावर लक्ष्मीचा फोटो छापावा, असा अजब दावा भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींनी केला आहे. मध्य प्रदेशमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुब्रमण्यम स्वामींनी भाषण केले त्यावेळी ते बोलत होते.

काय म्हणाले सुब्रमण्यम स्वामी?

‘मध्य प्रदेशमधील एका भाषणात ते बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, इंडोनेशियामध्ये आर्थिक मंदी असताना देखील १० हजाराच्या नोटावर गणपतीचा फोटो छापला आहे. कारण गणपती हे विघ्नहर्ता आहेत. तसेच धनाची देवी लक्ष्मीचा फोटो आपण नोटांवर छापला तर फायदा होणार. त्यामुळे यावर कुणाला वाईट वाटण्याचे कारण नाही’. कारण लक्ष्मी देवीचा फोटो छापावा, असे माझे मत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच त्यांना पुढील प्रश्न कायद्याबाबत विचारला असता ते म्हणाले की, या काद्यात काहीच चुकीचे नाही. अशा प्रकारचा कायदा आणण्यास महात्मा गांधींचाही पाठिंबा होता.


हेही वाचा – सातारा: राऊत आणि आव्हाडांच्या नावाची पाटी गाढवाला लावून काढली धिंड


प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here