घरदेश-विदेशGold Silver Price: ऐन सणासुदीच्या काळात सोने - चांदीच्या दरात वाढ

Gold Silver Price: ऐन सणासुदीच्या काळात सोने – चांदीच्या दरात वाढ

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात घसरण होत असल्याच्या दिलासालायक बातम्या येत असतानाच ऐन सणासुदीच्या तोंडावर पुन्हा एकदा सोने – चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहेत. सलग तिसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या दरात वाढ होत असून आज भारतीय बाजारात सोन्याच्या चांदीच्या किंमतींमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. एमसीएक्सवर डिसेंबरच्या बाजारात सोने २५२ रुपयांनी वाढून प्रति तोळा ५१ हजार १४२ रुपयांवर गेले आहे. तर चांदीची किंमत ४३६ रुपयांनी वाढून ६४ हजार १२२ प्रति किलोवर गेली आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीमध्ये घट नोंदवली गेली. सुरुवातीच्या सत्रामध्ये १ हजार ९३२.९६ डॉलरवर गेलेल्या सोन्याने ०.२ टक्के घट नोंदवत १ हजार ९२५.२९ डॉलर प्रति सरासरी आले असून डॉलरमध्ये ०.७ टक्क्यांची वाढ झाल्याने अन्य चलनांच्या देशांसाठी सोने महाग झाले आहे.

सोन्याच्या किंमतीत गेल्या काही दिवसांपासून घसरण होताना दिसत होती. मात्र गुरुवारी अचानक सोन्याच्या किंमतीत किरोकाळ वाढ झाली होती. त्यानंतर आज पुन्हा सोन्याचे दर वाढले आहे. काही दिवसांवर नवरात्र आणि दसऱ्याचा मोठा सण येऊन ठेपला आहे. अशात साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याच्या सणाला सोने खरेदीची लगबग ग्राहकांमध्ये पाहायला मिळते. मात्र कोरोना काळातील संकटामुळे आधीच आर्थिक पेचात सापडलेली जनता यंदाच्या सणाला सोने खरेदी करणार का याकडे सोने-चांदी विक्रेत्यांचे लक्ष लागले आहे. तसेच सोने-चांदीच्या व्यापारातील तेजीदेखील या ग्राहकांच्या प्रतिसादावर अवलंबून असल्याने दसऱ्याचा सण महत्त्वाचा मानला जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

मोठी बातमी: डिसेंबरपुर्वी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार – प्रकाश आंबेडकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -