Gold Price Today: सोन्या-चांदीचे भाव घसरले, जाणून घ्या किंमत

gold price today gold futures price fell silver futures prices
Gold Price Today: सोन्या-चांदीचे भाव घसरले, जाणून घ्या किंमत

आज सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. एमसीएक्स एक्सचेंजवर गुरुवारी सकाळी सोन्याची किंमतीत ०.२९ टक्के म्हणजेच १४६ रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याची किंमत ५० हजार १७९ रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचली आहे. जागतिक बाजारात देखील सोन्याची किंमतीत घसरण झाली आहे.

गुरुवारी सोन्या प्रमाणेच चांदीच्या किंमतीत देखील चांगलीच घसरण झाल्याचे दिसत आहे. एमसीएक्सवर गुरुवारी सकाळी चांदीच्या किंमतीत ०.८७ टक्के म्हणजेच ५४२ रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे चांदीची किंमत ६२ हजार १ रुपये प्रति किलोग्रामवर ट्रेंड झाली आहे. जागतिक बाजारात चांदीच्या किंमत देखील घसरण झाली आहे.

ब्लूमबर्गनुसार, जागतिक बाजारात गुरुवारी सकाळी सोन्याची किंमतीत ०.४१ टक्के म्हणजेच ७.७० डॉलर इतकी घसरण झाली आहे. त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याची किंमत १,८६६.२० डॉलर प्रति औंस आहे. तर चांदीचे किंमतीत ०.८९ टक्के म्हणजे ०.२२ डॉलर इतकी घसरण झाली आहे. त्यामुळे चांदीची किंमत जागातिक बाजारात २४.३४ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड होत आहे. याशिवाय जागतिक स्पॉट सोन्याच्या किंमतीत ०.२२ टक्के म्हणजेच ४.११ डॉलरची घट झाली असून सोन्याची किंमत १,८६८.१३ डॉलर प्रति औंस झाली आहे. तर चांदीच्या स्पॉट किंमतीत ०.४६ टक्के म्हणजेच ०.११ डॉलरची घट झाली असून २४.२३ डॉलर प्रति औंस झाली आहे.


हेही वाचा – ‘जुग जुग जियो’मध्ये दिसणार वरुण आणि कियाराची दमदार केमिस्ट्री