घरताज्या घडामोडीGold Price Update: खरेदीला लागा; सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण

Gold Price Update: खरेदीला लागा; सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण

Subscribe

आता सोने खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी आली आहे. कारण भारतात सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सुरूच आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीचा कोरोनाबाधितांमध्ये समावेश झाला आहे. त्याचाच कमॉडिटी बाजारावर पडसाद उमटले असून सोन्या आणि चांदीच्या किंमतीत घसरणीचे सत्र कायम आहे.

सोन्याच्या दरात ०.९ टक्क्यांनी घसरण होऊन ५० हजार ८८ रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहे. तर चांदीच्या दरात १.५ टक्क्यांनी घसरण होऊन ५९ हजार ६५८ रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. गेल्या सत्रात सोन्याच्या दरात ०.३२ टक्क्यांची घसरण झाली होती. तर चांदीच्या १ हजार ४५० रुपये म्हणजे २.३ टक्क्यांनी प्रति किलोग्रॅम स्वस्त झाली होती. अशा प्रकारे दोन दिवसांत चांदीच्या किंमतीत २ हजार ५०० रुपयांची घट झाली आहे. तज्ज्ञांच्या मते अमेरिकेतील डॉलर आणि सामान्य बाजारानुसार सोन्याच्या किंमतीत घसरण होईल. पण येणाऱ्या सणाच्या दिवशी भारतात सोन्याच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -
हे वाचा – घरातल्या सोन्यावर दुप्पट नफा मिळवण्याची संधी; SBI ची स्किम तर बघा

जागतिक बाजारात गेल्या सत्रात दोन टक्क्यांनी घसरण झाल्यानंतर सोन्याची किंमत १,८७७.१५ डॉलर प्रति औंसवर होती. डॉलरच्या मजबुतीचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला. डॉलर इंडेक्स निर्देशांक ०.२ टक्क्यांनी वधारला. यामुळे चांदी ०.७ टक्क्यांनी वधारुन २३.२३५ डॉलर प्रति औंस झाली. प्लॅटिनम एक टक्क्यांनी वधारुन ८५६.५१ डॉलर झाला. तर पॅलेडियम ०.१ टक्क्यांनी घसरून २,३३९.८१ डॉलर झाला.

 

- Advertisement -

हेही वाचा- महत्त्वाची बातमी: आता मोबाईल रोजगार देणार, ५ वर्षात २ लाख रोजगार उपलब्ध होणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -