बापरे! ढगातून सोन्याच्या बिस्कीटांचा पाऊस; गावकऱ्यांची केली सोनं लुटायला गर्दी

सूरत शहरातील खेड्यात सोन्याचा पाऊस पडला आणि लोकं हे सोने घेण्यासाठी घराबाहेर पडले

तुम्ही कधी सोन्याचा पाऊस झाल्याचे ऐकले आहे का? नाही न..पण गुजरातमधील सूरत शहरात सोन्याचा पाऊस पडल्याचे सांगितले जात आहे. सूरत शहरातील खेड्यात सोन्याचा पाऊस पडला आणि लोकं हे सोने घेण्यासाठी घराबाहेर पडले. मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्रीपासून सूरत विमानतळाजवळील डुम्मस खेड्यातील गावकऱ्यांना सोन्यासारख्या काही वस्तू रस्त्यात पडलेल्या दिसून आल्यात.  सोन्यासारख्याच रूपात दिसणारे हे धातू रस्त्यात आणि गावातील झाडा-झुडपांतून कसे आले हे अद्याप कोणालाही समजू शकले नाही. मात्र ज्या गावकऱ्यांना हे सोनं हाती लागले त्यांनी त्यांच्यासह ते सोनं घरी आणले.

सोनं मिळल्याची बाब गावात आगीसारखी पसरली. लोक सोनं घेण्यासाठी डुम्मस गावात येऊ लागले. रात्रीच्या वेळीसुद्धा लोकं येथे फ्लॅशलाइट सोबत घेऊन सोने शोधत असतात. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, काही लोक रात्री पायी चालत असताना त्यांना ही चमकणारी सोन्यासारखी वस्तू आढळली.

या लोकांनी गावातील बाकीच्या गावकऱ्यांनी याची माहिती दिली आणि सोन्यासारखी ही चमकणारी वस्तू शोधण्यासाठी लोक घराबाहेर पडले. काही लोक म्हणतात की ही चमकणारी वस्तू सोने किंवा पितळ आहे, हे कोणालाही माहित नाही. काही लोकं येथे सोने असेल म्हणून त्याच्या शोध घेत आहेत.

सोनं शोधण्यासाठी आलेल्या सूरतच्या मोहन भाई यांनी सांगितले की, काल रात्री येथे काही लोकांना सोनं सापडलं होतं, त्यानंतर हळूहळू सगळ्यांना कळलं. मीसुद्धा येथे सोने शोधण्यासाठी गेलो. पण मला अद्याप काहीही मिळाले नाही. विशेष म्हणजे ते सोने आहे की पितळ, हे अद्याप कोणालाही माहित नाही. पण आता लोक सोने शोधण्यासाठी इथे मोठ्या संख्येने येत आहेत.


GoodNews! सणा-सुदीच्या तोंडावर सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण; जाणून घ्या किंमत